Ganesha idol workshop : इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात

समर्थनगर येथील श्री वरद गणेश वाचनालय आणि रंगरेषा फाईन आर्ट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोज करण्यात आले आहे.
Ganesha idol workshop
Ganesha idol workshop : इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहातfile photo
Published on
Updated on

Eco-friendly Ganesha idol workshop held with enthusiasm

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समर्थनगर येथील श्री वरद गणेश वाचनालय आणि रंगरेषा फाईन आर्ट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत भाविकांचा प्रतिसाद मिळाला.

Ganesha idol workshop
Sambhajinagar News : खड्यांनी पोखरले शहरातील रस्ते

या कार्यशाळेत सहभागी नागरिकांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यशाळेत विविध वयोगटांतील सहभागींसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक रवी गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच वरद गणेश मंदिराचे अध्यक्ष सुनील खोचे, सामाजिक कार्यकर्त्या शैलजा धोकटे, क्रीडा पितामह पुरस्कार विजेते दीपक तेलंग आणि वरद गणेश वाचनालयाच्या अध्यक्षा निर्मला तरटे यांची उपस्थिती लाभली. यावेळी अनिल वाळुस्कर, जगदीश हर्मूलकर, मयुरेश कोटणीस, भालचंद्र सबनीस, अरुण जोशी, उषा देशपांडे आणि प्रकाश पिंगे यांचीही उपस्थिती होती.

Ganesha idol workshop
Abhijit Dipke : न्यायालयाने विद्यार्थ्यांसोबत न्याय केला

कला संस्कृती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक विठ्ठल पैठणकर तसेच रंगरेषा फाईन आर्टचे संचालक व कार्यक्रमाचे आयोजक गोकुळ पैठणकर यांच्या मार्गदर्शन आणि अथक परिश्रमातून ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. यावेळी मानसी मुळे यांनी सूत्रसंचालन केले. आर्टिस्ट आस्था शाहणे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news