जप्त केलेल्या मालमत्तेचे सील परस्पर उघडले; लाभ चेंबर्समधील प्रकार, गुन्हा दाखल

महापालिकेच्या वतीने शहरात मार्चएण्डच्या तोंडावर थकीत मालमत्ता करापोटी जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे
Crime News
जप्त केलेल्या मालमत्तेचे सील परस्पर उघडले; लाभ चेंबर्समधील प्रकार, गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

Seals on Seized Property Illegally Broken; Incident at Labh Chambers, Case Registered

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वतीने शहरात मार्चएण्डच्या तोंडावर थकीत मालमत्ता करापोटी जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात आतापर्यंत ८.३९ कोटींसाठी ८१ हून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

Crime News
मालमत्ता कर थकला, मनपाकडून सहा व्यावसायिक मालमत्ता सील

यात रेल्वेस्टेशन रस्त्यावरील लाभचेंबर्समधील दुकान क्रमांक ३०५ च्या व्यावसायिकाने महापालिकेचे सील परस्पर उघडून व्यवसाय सुरू केला. हा प्रकार लक्षात येताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालकाविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या महिनाभरात कर वसुलीच्या मोहिमेत थकीत करासाठी ८१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मालमत्तांकडे ८ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, यातील रेल्वेस्टेशन रस्त्यावरील लाभ चेंबर्समध्ये दुकान क्रमांक ३०५ चा २०२३ सालापासून कर थकला आहे. हे दुकान सुनंदा शंकरलाल लाहोटी यांच्या मालकीचे आहे.

Crime News
Municipal tax recovery drive : कर थकबाकीदारांवर मनपाचा हतोडा; दोघांच्या मालमत्ता सील

करा पोटी त्यांच्याकडे २ लाख ९० हजार २२३ रुपये थकले आहेत. त्यामुळे हे दुकान महापालिकेच्या पथकाने सील करून जप्त केले होते. मात्र त्यावरही दुकानाचे सील तोडून व्यवसाय सुरू केले होते. त्यावरून सोमवारी महापालिकेच्या पथकाने परस्पर सील तोडल्याच्या कारणाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news