Municipal tax recovery drive : कर थकबाकीदारांवर मनपाचा हतोडा; दोघांच्या मालमत्ता सील

मनपाची धडक मोहीम, 3 आठवड्यांत 200 कोटी वसुलीचे टार्गेट jk
Municipal tax recovery drive
मालमत्ता कर थकविणाऱ्याचे दुकान सील करताना महापालिकेचे पथक.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. व्यावसायिक मालमत्ताधारकांकडे थकलेली लाखो रुपयांची थकबाकी वसुलीसाठी कारवाई सुरू केली असून, झोन-5 अंतर्गत कॅनॉट गार्डन येथील पटेल युनिव्हर्सलने थकीत 14 लाख 78 हजार रुपयांच्या कर भरणा न केल्याने दुकान सील केले. त्यासोबतच झोन-2 मध्ये असलेल्या सिंगापूर कॉम्प्लेक्स येथील रामानंद शर्मा यांचे दुकानाही सील करण्यात आले.

बुधवारी झोन-5 कार्यालयांतर्गत असलेल्या कॅनॉट गार्डनमधील व्यावसायिक मालमत्ताधारकांकडील कर वसुलीकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. पटेल युनिव्हर्सल यांच्याकडे 14 लाख 78 हजार रुपयांचा मालमत्ता कर थकला असतानाही आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मनपाच्या कर वसुली पथकाने दाखवले नाही. मात्र मनपा आयुक्तांनी वसुलीचा दट्‌‍ट्या देताच पथकाने कारवाई सुरू केली.

Municipal tax recovery drive
Congress internal dispute Jalna : स्वीकृत नगरसेवक पदावरून काँग्रेसमध्ये वाद पेटला

पटेल युनिव्हर्सल यांचे दुकान सील करण्यात आले. ही कारवाई झोन-5 च्या सहायक आयुक्त प्राजक्ता वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक मुकुल बांगर, गणपत जाधव, सूर्यकांत कांबळे, लोकेश मोरे यांनी केली. तसेच झोन-2 कार्यालयातंर्गत मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगापूर कॉम्प्लेक्समधील दुकान नंबर 4 चे मालक रामानंद शर्मा यांच्याकडे 1 लाख 6 हजार 497 रुपये करापोटी थकले होते. कर न भरल्यामुळे शर्मा यांच्या दुकानास सील ठोकण्यात आले. ही कारवाई कर अधीक्षक महानोर, पथकप्रमुख रोहित चव्हाण, अलमोद्दीन, राजू राठोड, संजय गवई, अरुण बनसोडे, शेख अनिस, योगेश मगरे, केवल पायकडे यांनी केली.

Municipal tax recovery drive
Land records employees strike : भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन

मार्चएण्डच्या वसुलीला सुरुवात

महापालिकेने होळी उत्सव होताच आता मार्चएण्डच्या वसुलीला सुरुवात केली आहे. शहरातील महापालिकेच्या सर्व झोन कार्यालयांनी कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांना सील करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील अनेक

मालमत्ताधारकांकडे कोट्यवधी रुपयांचा कर थकला आहे. कर वसुलीसाठी दोनवेळा सवलत जाहीर करूनही अनेकांनी भरणा केला नाही. मार्च महिना सुरू झाला असून, कराच्या वसुलीसाठी थेट सील आणि जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी कर भरा असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news