

Savitribai Phule is a symbol of social revolution: MLA Abdul Sattar
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा स्त्री शिक्षणाच्या दीपस्तंभ, सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सिल्लोड शहरात मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातील सावित्रीबाई फुले चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, ज्या काळात मुलींचे शिक्षण पाप मानले जात होते, त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी क्रांती घडवली असून त्यांच्या विचारांतूनच समतेचे व सशक्त समाजाचे स्वप्न साकार होत आहे. शिक्षण क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले म्हणजे ज्ञान, संघर्ष आणि सामाजिक क्रांतीचे प्रतीक असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्त्री शिक्षणासाठी समाजाच्या विरोधाला न जुमानता आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष सचिन गोरे, शहराध्यक्ष राजेंद्र बन्सोड, उपाध्यक्ष योगेश कुदळ, कार्याध्यक्ष संतोष धाडगे, जिल्हा सचिव नारायण फाळके, मंजी-तराव भाग्यवंत, अशोक बनसोड, जगन्नाथ उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेविका राजश्री निकम, सुमनबाई अशोक बन्सोड, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, अकिल वसईकर, बबलू पठाण, सुधाकर गायकवाड, इम्रान शेख, शिवा टोम्पे, गौरव सहारे, राजेंद्र ठोंबरे, शेख जावेद, दत्ता वाघ, विशाल प्रशाद उपस्थित होते.