Mahayuti News : महायुतीकडून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक : तिन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती
Mahayuti News
Mahayuti News : महायुतीकडून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखलfile photo
Published on: 
Updated on: 

Satish Chavan files nomination papers on behalf of the Mahayuti

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी सोमवारी (दि. ५) विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahayuti News
Agriculture News : पाणीटंचाईने अद्रक मातीमोल दराने विकण्याची वेळ

महायुतीतर्फे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गोदावरी पब्लिक स्कूल येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री अतुल सावे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांची उपस्थिती होती.

यावेळी आ. चव्हाण यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना भावनिक भावना व्यक्त केल्या. पदवीधर मतदारांनी गेल्या तीन टर्मपासून प्रतिनिधित्वाची संधी दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, अजित पवार यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि विश्वास कायम सोबत असल्याचे चव्हाण म्हणाले.

तसेच अजित पवार यांनी दाखविलेल्या विकासाच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करताना मराठवाड्यातील प्रत्येक पदवीधराने याच भागात शिकावे, घडावे आणि मोठे व्हावे, हा संकल्पही त्यांनी मांडला. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, राजेश विटेकर, बालाजी कल्याणकर, प्रशांत बंब, प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahayuti News
Sambhajinagar News : कुंभार समाजबांधवांसाठी ७०० ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ

अजितदादा पवारांच्या आठवणीने चव्हाण भावु

आ. सतीश चव्हाण यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना तीन टर्म पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे. मात्र, दादांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांचे मार्गदर्शन आणि विश्वास कायम सोबत ठेवून विकासाची दिशा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news