Agriculture News : पाणीटंचाईने अद्रक मातीमोल दराने विकण्याची वेळ

जवखेडा बु. परिसरातील अद्रक उत्पादकांची दुहेरी कोंडी; उत्पादन घटले
Agriculture News
Agriculture News : पाणीटंचाईने अद्रक मातीमोल दराने विकण्याची वेळfile photo
Published on: 
Updated on: 

Water scarcity forces sale of ginger at throwaway prices

पिशोर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील जवखेडा बु. परिसरातील अद्रक उत्पादक शेतकरी यंदा दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे पाण्याअभावी शेतातील अद्रकाची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट झाली आहे, तर दुसरीकडे बाजारात आद्रकाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक मातीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Agriculture News
Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana : उत्कृष्ट कृषी कामगिरीने संभाजीनगरचा दिल्लीत सन्मान

अद्रक हे पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असलेले पीक आहे. मात्र, यंदा परिसरातील विहिरी तसेच इतर जलस्रोत आटत चालल्याने पिकाला आवश्यकतेनुसार पाणी देणे शक्य झाले नाही. पाण्याअभावी अद्रकाची वाढ खुंटली असून अनेक शेतांमध्ये उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. मोठा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

खर्च वाढला; उत्पन्न घटले, अद्रक लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी तसेच सिंचनासाठी मोठा खर्च करावा लागतो. गेल्या काही काळात शेतीचा उत्पादन खर्च वाढत असतानाच पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने अतिरिक्त खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडला आहे. मात्र, उत्पादन घटल्याने उत्पन्नात मोठी घट झाली असून बाजारभावही समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे.

'पकिाला पाणी नाही, बाजारात भाव आणि तयार झालेल्या अद्रकाला बाजारात योग्य दर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नुकसान अधिक वाढण्यापूर्वी उभे पीक काढून व्यापाऱ्यांना विकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मिळणारा दर पाहता लागवडीपासून काढणीपर्यंत झालेला खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Agriculture News
Vaijapur News : धरणे कोरडीठाक : आता कसरत पिण्याच्या पाण्यासाठी!

वर्षभर कुटंबाट शेतात उभे केलेले पीक अपेक्षित उत्पन्न न देता मातीमोल दराने विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने पुढील हंगामासाठी भांडवल उभे करायचे कसे, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पाणीटंचाईमुळे झालेली पिकांची हानी आणि बाजारभावातील घसरण या दोन्ही बाबींचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी होत आहे.

""एकीकडे शेतीसाठी पाणी नाही, तर दुसरीकडे बाजारात पीकाला योग्य भाव नाही. कर्ज काढून शेती केली; मात्र हातात काहीच शिल्लक राहत नाही. शेती करायची तरी कशी आणि कुटुंबाचा खर्च भागवायचा तरी कसा, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे." -
आजिनाथ हराळ, शेतकरी, जवखेडा
" शेतकऱ्यांच्या व्यथा " पिकासाठी वर्षभर मेहनत केली आणि मोठा खर्च केला; मात्र पाणी कमी पडल्याने आद्रकाचे उत्पादन घटले. आता मिळणारा बाजारभाव पाहता केलेला खर्चही निघत नाही. व्यापाऱ्यांना मातीमोल दराने आद्रक विकण्याची वेळ आली आहे. शासनाने पाणीटंचाई आणि आद्रकाच्या दराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे."
- योगेश सर्जेराव हराळ, शेतकरी, जवखेडा बु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news