Sambhajinagar News : कुंभार समाजबांधवांसाठी ७०० ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ

शासनाकडून कुंभार ओळखपत्रांचे वाटप; विविध उपकरणे मोफत देणार
Sambhajinagar News
Sambhajinagar News : कुंभार समाजबांधवांसाठी ७०० ब्रास मातीवरील रॉयल्टी माफfile photo
Published on: 
Updated on: 

Royalty on 700 brass of soil waived for members of the Kumbhar community

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : कुंभार समाजातील मातीकाम करणाऱ्या कारागिरांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, कुंभार बांधवांसाठी ७०० ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. तसेच कुंभार समाजातील पात्र महिला व पुरुष कारागिरांना शासनाच्या माध्यमातून कुंभार ओळखपत्र देण्यात येत आहे. या निर्णयामुळे पारंपरिक मातीकाम व्यवसायाला चालना मिळणार असून, समाजातील कारागिरांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मनपाच्या सीॲण्ड डी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

राज्यस्तरीय कुंभार समाजाच्या कार्यक्रमात कुंभार बांधवांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट व आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थी गोकुळ भागीनाथ मरकड यांना कुंभार ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संजय जोरले, कुंभार संघटनेचे ज्येष्ठ नेते उमाकांत सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रामदास इंगळे, नगरसेवक सुरेश मरकड, प्रदेश उपाध्यक्ष मनोहर तागंडे, सरचिटणीस मनोहर मरकड, अर्थनियोजन अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हसके, मुरलीधर तिडके, शहराध्यक्ष प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

मातीकाम करणाऱ्या कुंभार समाजातील महिला व पुरुषांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेविका कांता सुरेश मरकड यांनी केले.

Sambhajinagar News
Drought : दुष्काळाच्या झळांनी बैलजोड्या विकण्याची वेळ

कागदपत्रांची पूर्तता करून ओळखपत्र घ्यावे

कुंभार समाजातील नागरिकांसाठी शासनाने ७०० ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाजबांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित तालुका तहसील कार्यालयातून कुंभार ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष रामदास इंगळे यांनी केले.

इलेक्ट्रिक कुंभार चाक, माती मळणी यंत्रही मिळणार

पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मातीकाम करणाऱ्या पुरुष व महिलांना इलेक्ट्रिक कुंभार चाक, माती मळणी यंत्र तसेच अन्य आवश्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे कुंभार कारागिरांचा वेळ व श्रम वाचून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news