

Sangram from Sambhaji Nagar has been selected for 'Project Mahadeva'
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरचा उदयोन्मुख फुटबॉलपटू संग्राम मच्छिद्र देवकर याची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित प्रोजेक्ट महादेवा या पाच वर्षांच्या निवासी फुटबॉल विकास योजनेत निवड झाली आहे.
ही निवड शहरासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. अवघ्या सातव्या वर्षी फुटबॉलची सुरुवात केलेल्या संग्रामने प्रतिकूल परिस्थितीतही दररोज सराव करत आपली जिद्द सिद्ध केली.
प्रशिक्षक शेख उमेर सिकंदर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खेळाला योग्य दिशा मिळाली. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत आता संग्राम मुंबई येथे पाच वर्षांच्या निवासी कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्याच्या शिक्षण, निवास, आहार व जागतिक दर्जाच्या फुटबॉल प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन घेणार आहे.