Sambhajinagar Crime News : कारला धक्का दिल्याचा जाब विचारल्याने एकाला मारहाण

हॉटेलच्या पार्किंगमध्ये एकाने कारला धक्का दिल्याने त्याला जाब विचारणाऱ्या नागपूरच्या कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण झाली.
Crime News |
Sambhajinagar Crime News : कारला धक्का दिल्याचा जाब विचारल्याने एकाला मारहाणFile Photo
Published on
Updated on

A man was beaten up for questioning someone about hitting his car.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हॉटेलच्या पार्किंगमध्ये एकाने कारला धक्का दिल्याने त्याला जाब विचारणाऱ्या नागपूरच्या कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण झाली. ही घटना रविवारी (दि. २१) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सिडको एन-३ भागातील द रिच हॉटेलसमोर घडली. कारचालक (एमएच-२८-एएन-३६८८) आणि हॉटेलचे मॅनेजर अथर आणि भागवेश अशी आरोपींची नावे आहेत.

Crime News |
Nylon Manja : नागरिकांनो, गळे सांभाळा, नाताळात पतंगबाजीला येणार ऊत

फिर्यादी राहुल रमेशचंद खाबिया (३९, रा. नागपूर) हे साई अँग्रीओम या कंपनीत अधिकारी आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, ते सिडको एन-३ हॉटेलमध्ये थांबलेले होते. रात्री दीडच्या सुमारास त्यांना चालकाने कॉल करून पार्किंगमध्ये एका कार चालकाने त्यांची कार पार्क करताना आपल्या कारला धक्का दिला, अशी माहिती कळविली.

त्यावरून खाबिया यांनी तात्काळ हॉटेलच्या बाहेर येऊन आरोपी कारचालकाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यावरून त्याने वाद घालून खाबिया यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर आरोपी कारचालकाने कार मागे घेताना खाबिया यांना धडक दिल्याने ते खाली पडल्याने जखमी झाले.

Crime News |
Paithan Crime News : गोदावरी नदीत अर्धवट धडाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

त्यानंतर कारचालक तेथून पसार झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. द रिच हॉटेलच्या मॅनेजरनेही केली शिवीगाळ खाबिया यांच्याशी आरोपी कारचालक वाद घालून मारहाण करत असताना त्यांनी हॉटेलचा मॅनेजर अथर आणि भागवेश दोघांना हा प्रकार सांगितला. ते दोघे तेथे आले, मात्र त्यांनी आमच्या हॉटेलचे नाव खराब करू नका, असे म्हणत त्यांनीही खाबिया यांना शिवीगाळ केली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पुंडलिक नग पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news