Paithan Crime News : गोदावरी नदीत अर्धवट धडाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जीवन संपवले की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू
 body found
प्रातिनिधिक छायाचित्र(File Photo)
Published on
Updated on

A dead body found in the Godavari river creates a stir

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरालगत पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पाण्यात सात दिवसांपूर्वी एक खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (दि.२२) सायंकाळी अर्धवट धडाचा कुजलेला अनोळखी मृतदेह आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा, यासंदर्भात पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 body found
School ID scam : चौकशी पथक धडकले, संचिकांची तपासणी सुरू

शहरापासून जवळच पाटेगाव येथील गोदावरी नदीत सात दिवसांपूर्वी गदेवाडी (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) येथील मूकबधिर व्यक्तीचा खून करून मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत पोत्यामध्ये आणून पाटेगाव येथील गोदावरी नदीपात्रात टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. सोमवारी सायंकाळी नदीत मासेमारी करणाऱ्या तरुणांना पाटेगाव येथील गोदावरी पुलापासून तीन किलोमीटर अंतरावर अर्धवट धडाचा कुजलेला मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आला.

याची माहिती त्यांनी पैठण पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, सपोनि सी.पी. पवार, पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे हवालदार रावसाहेब आव्हाड नरेंद्र अंधारे, राजेश आटोळे, गायकवाड या पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला.

 body found
Nylon Manja : नागरिकांनो, गळे सांभाळा, नाताळात पतंगबाजीला येणार ऊत

पोलिसांना घातपाताचा संशय

सदरील मृत व्यक्तीच्या कमरेच्या खालचा भाग पूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच अंगामध्ये निळसर रंगाची पॅन्ट असून, या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात ठेवला आहे. आत्महत्या की घातपात, यासंदर्भात पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे असे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news