

Sambhajinagar's industries take a step towards global competence
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन नेप्कॉन व्हिएतनाम २०२५ साठी मसिआचे ४३ उद्योजकांचे शिष्टमंडळ अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांच्या नेतृत्व-ाखाली सोमवारी (दि.८) रवाना झाले. या दौऱ्यात उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन व ऑटोमेशन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासोबत जागतिक स्तरावर छत्रपती संभाजीनगरचे उद्योग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ) तर्फे ९ ते १४ सप्टेंबरपर्यंत हा अभ्यास दौरा आहे. नेप्कॉन व्हिएतनाम हे आग्नेय आशियातील अग्रगण्य औद्योगिक प्रदर्शन असून, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, एसएमटी तंत्रज्ञान, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि इंडस्ट्री ४.० सोल्यूशन्स या क्षेत्रातील अत्याधुनिक घडामोडी समजून घेण्याची उद्योजकांना संधी आहे.
आज उद्योगक्षेत्र झपाट्याने बदलत आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट ऑटोमेशन, ई व्हेईकल, रोबोटिक्स, एआय आधारित उत्पादन प्रक्रिया आणि इंडस्ट्री ४.० या तंत्रज्ञानामुळे स्पर्धात्मकता टिकवून ठेवणे आवश्यक झाले आहे. या दौऱ्यात स्थानिक उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून नवनवीन गुंतवणूक, उत्पादनक्षमता वाढ आणि निर्यात संधी उपलब्ध होतील, असा विश्वास अर्जुन गायकवाड यांनी व्यक्त केला.
या अभ्यास दौऱ्यासाठी अध्यक्ष गायकवाड, माजी अध्यक्ष चेतन राऊत, सचिव दिलीप चौधरी, कोषाध्यक्ष सर्जेराव साळुंके, सदस्य दुष्यंत आठवले, श्रीकांत सूर्यवंशी, संयोजक राजेश विधाते यांच्यासह एकूण ४३ उद्योजक सदस्य रवाना झाल्याचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र चौधरी, संदीप जोशी यांनी कळवले.
या दौऱ्यात उद्योजक थेट जागतिक स्तरा-वरील कंपन्यांशी संवाद साधतील. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक पाहतील व नवीन व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करतील. याचा थेट फायदा आपल्या स्थानिक उद्योगांना होईल. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन खर्च कमी करणे, गुणवत्ता सुध-ारणा आणि जागतिक बाजारपेठेत निर्यात वाढविणे.