Sambhajinagar News
Sambhajinagar News : मनपाला ५ प्रमुख रस्त्यांसाठी हवे १९५० कोटी File Photo

Sambhajinagar News : मनपाला ५ प्रमुख रस्त्यांसाठी हवे १९५० कोटी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला प्रस्ताव; कुंभमेळ्यामुळे वेरूळलाही गर्दी वाढणार
Published on

Sambhajinagar News: Municipal Corporation wants 1950 crores for 5 major roads

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक नाशिकमध्ये दाखल होतील. यातील बहुतांश भाविक हे शनिशिंगणापूरहून वेरूळमधील घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरात येतील. त्यामुळे शहराचे प्रवेश-द्वार जालना रोड, जळगाव रोड, जुना मुंबई रोड, पैठण रोड आणि बीड बायपास हे प्रमुख पाच रस्ते सुसज्ज करणे आवश्यक आहे, त्यासाठी नुकतीच महापालिकेने या रस्त्यांच्या रुदीकरणासाठी पाडापाडी केली असून, शासनाने रस्त्यांच्या कामासाठी १९५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, असा प्रस्ताव सोमवारी (दि.८) प्रशासक जी. श्रीकात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आढावा बैठकीत सादर केला.

Sambhajinagar News
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर, सहा दिवसांत बिबट्याच्या दुसऱ्या हल्ल्याने गारज हादरले

यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश बोरणारे, अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यादृष्टीने पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महापालिकेच्या विकासकामांचाही आढावा घेतला.

यात प्रामुख्याने त्यांनी रस्ते, पाणीप रवठा योजनेच्या कामाचा आढावा जाणून घेतला. तसेच विकास आराखड्यातील रस्ते, सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेत ८ रस्त्यांवरील पाच हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहे. रुंद झालेल्या रस्त्यांची कामे करण्यासाठी पेडीको एजन्सीमार्फत प्रस्ताव तयार केला जात आहे. या मुख्य रस्त्यांच्या कामासाठी १९५० कोटी रुपयांची गरज असल्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. त्यावर शिंदे यांनी कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून ठाणे, कल्याणमध्ये रस्त्यांची कामे केली आहेत. त्याचा अभ्यास करून हे मॉडल छत्रपती संभाजीनगरात राबवा, अशी सूचना केली. त्यासोबत महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे. मालमत्ताकराची वसुली वाढवा, अशा सूचना त्यांनी केल्या.

Sambhajinagar News
Viral Infection : बालकांना जपा! लहान मुलांमध्ये वाढले व्हायलर इन्फेक्शन

पाडापाडीतील बेघरांना मोफत घरे

रस्ता रुंदीकरणातील बेघर झालेल्यांना म्हाडामार्फत घरे देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लागणारे शुल्क म्हाडातर्फे माफ केल्यास बेघरांना परवडतील अशी घरे मिळतील, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असे शिंदे यांनी नमूद केले. सुंदरवाडी भागात १० हेक्टर जमीन डीरिझर्व केल्यास याठिकाणी १० हजार घरे होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

२० मिनिटांत आटोपला आढावा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महापालिकेच्या कामासह शहर विकासाचा आढावा घेतला. यात अधिकाऱ्यांनी घाईघाईत सादरीकरण करून पाडापाडीसह इतर माहिती दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाला काही सूचनाही केल्या.

मार्चपासून दररोज पाणीपुरवठा

शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टकण्यात येत असून, या कामाचा पहिला टप्पा येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण करून २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. तर दुसरा टप्पा मार्चमध्ये पूर्ण करून दररोज पाणी दिले जाईल, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news