Health Centre : स्मार्ट आरोग्य केंद्रांच्या निविदेवरून जि. प. स्थायी समितीत खडाजंगी !

एकाच कंत्राटदाराला लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचा सदस्यांचा आरोप
Health Centre
Health Centre : स्मार्ट आरोग्य केंद्रांच्या निविदेवरून जि. प. स्थायी समितीत खडाजंगी !file photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar Zilla Parishad over the tender Smart Health Centres

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : १५ कोटी रुपयांच्या खर्चातून जिल्ह्यात २३ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावाने जिल्हा परिषदेत नवा वाद निर्माण केला आहे. बांधकाम, विद्युत कामे आणि वैद्यकीय साहित्य खरेदीची एकत्रित निविदा काढण्यामागील हेतू काय, असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

Health Centre
Sambhajinagar News : खुलताबाद नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा बहिष्कार !

निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवरून सदस्य आणि आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये बुधवारी (दि.४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी आरोग्य सभापती अनिता मोठे उपस्थित होत्या.

शिंदेसेनेचे गटनेते डॉ. राधाकिसन पठाडे यांनी स्मार्ट पीएचसीच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. ठराविक कंत्राटदाराला काम मिळावे, यासाठी बांधकाम, विद्युत कामे आणि वैद्यकीय साहित्य खरेदीची एकत्रित निविदा काढण्यात आली आहे का, असा सवाल त्यांनी केला. वैद्यकीय साहित्य, औषधे आणि उपकरणांची खरेदी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून का केली नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.

Health Centre
Chief Minister's Relief Fund : मुलाच्या विवाहाचा शाही थाट टाळत शेतकऱ्यांसाठी दिला १ कोटीचा निधी

यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी जेम पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होत असल्याने महा-ई-टेंडरवर निविदा प्रसि केल्याचे सांगितले. मात्र, एका कंत्राटदाराकडे विविध प्रकारची क देण्याच्या निर्णयावर सदस्यांनी आधे घेतला. ही निविदा रद्द करण्यान मागणीही करण्यात आली.

डीएचओ आणि सभापतींत शाब्दिक चकमक

निविदा रद्द करणे शक्य असल्याचे सांगतानाच हवेत केलेले आरोप सहन करणार नसल्याची भूमिका जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी घेतली. यामुळे त्यांच्यात आणि सभापती सचिन गरड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वाढता वाद पाहून अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी हस्तक्षेप करीत सदस्यांना संयम राखण्याच्या सूचना दिल्या. मात्र, स्मार्ट पीएचसीच्या निविदा रद्द करण्याबाबत बैठकीत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही

अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीवरून संभ्रमा

बांधकाम सभापती सचिन गरड यांनी संबंधित विभागांना विश्वासात न घेता निविदा काढल्याचा आरोप केला. कार्यकारी अभियंता किरण धनके यांनी निविदेवर आपण स्वाक्षरी केली नसल्याचे, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनीही याबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे निविदा प्रक्रियेच जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.