Sambhajinagar News : खुलताबाद नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा बहिष्कार !

मनमानी कारभार, पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले; मंजूर ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप
Sambhajinagar News
Sambhajinagar News : खुलताबाद नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा बहिष्कार !file photo
Published on: 
Updated on: 

Boycott of 10 corporators of NCP on the general meeting of Khultabad Municipal Council!

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवाः खुलताबाद नगर परिषदेत बुधवारी (दि.चार) आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कथित मनमानी कारभारासह शहरातील विविध नागरी प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि मागील सभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले.

Sambhajinagar News
Vaijapur Crime News : तरुणाच्या मृत्यूनंतर वैजापुरात तणावपूर्ण शांतता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदेकडून भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जागा व करासंदर्भातील पूर्वी रद्द करण्यात आलेल्या निर्णयांबाबत ११ ऑगस्ट रोजी झालेल्या मागील सर्वसाधारण सभेत संबंधित प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, या महत्त्वपूर्ण विषयाचा समावेश आगामी सभेच्या विषयपत्रिकेत करण्यात आलेला नसल्याचा आक्षेप नगरसेवकांनी घेतला आहे. याशिवाय, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रभागातील विकासकामांना अपेक्षित प्राधान्य दिले जात नसून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वाढत्या प्रश्नावर शहरातील पाणीटंचाईच्या प्रशासनाकडून ठोस नियोजन व प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित नगरसेवकांनी कला. मागील सर्वसाधारण सभेतील इतर विषय या सदराखाली शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे महत्त्वपूर्ण प्रश्न चर्चेला येणे अपेक्षित होते.

मात्र, प्रशासन व नगराध्यक्षांकडून हे विषय जाणीवपूर्वक विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून, या बहिष्कारामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Sambhajinagar News
Crime News : सातारा गावात महावितरणच्या पथकाला शिवीगाळ करत धमकावले

नागरिकांच्या हितासाठी भूमिका ठामपणे मांडणार

नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, मंजूर ठरावांची अंमलबजावणी न होणे आणि नगरसेवकांना विश्वासात न घेता कारभार सुरू असल्याच्या निषेधार्थ दहा नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होऊन प्रलंबित ठरावांची अंमलबजावणी होईपर्यंत नागरिकांच्या हितासाठी आपली भूमिका ठामपणे मांडत राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.