

Sambhajinagar The Pro-Vice-Chancellor violated UGC rules
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: प्र कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी यूजीसीने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रो.डॉ. शंकर अंभोरे, डॉ. प्रो. किशोर साळवे, प्रा विलास पांडे यांनी राज्यपालांसह कुलगुरूंकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
वरील तक्रारकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात प्र कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी यूजीसी रेग्युलेशन २००३, २०२२ आणि महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करत, मूळ विषयाव्यतिरिक्त इतर विषयात पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे गाईड बनले आहेत. सेवानिवृत्तीसाठी ३ वर्षांचा कालावधी असताना गाईडशिप घेता येत नाही, तरीही सरवदे यांनी नवीन विद्यार्थी पीएचडीसाठी आपल्याकडे घेतले आहेत. प्रशासकीय पदावर असताना मार्गदर्शकाची भूमिका पार पाडता येत नाही.
या यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व बाबींची उच्चस्-तरीय चौकशी करून त्यांच्या मार्गदर्शनाखालील आतापर्यंत झालेल्या सर्व नियमाबाह्य पीएचडी नोंदणी रद्द करण्यात यावी. तसेच आठ दिवसांपूर्वी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनशास्त्र विषयाचे चार विद्यार्थी पीएचडी संशोधनासाठी घेतले, ती नोंदणी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी अंभोरे, साळवे पांडे यांनी केली आहे.