

A police officer's wife beat a woman with a fiberglass stick.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरासमोर रुग्णवाहिका लावण्यास मज्जाव करत पोलिस पत्नीने घाटी रुग्णालयातील कक्ष सेविकेला फायबरच्या काठीने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.२१) सायंकाळी सातच्या सुमारास गणेश टेकडीजवळ, पार्वतीनगर भागात घडली.
रजनी ठाकूर (५०, रा. अमोदी हिल, पार्वतीनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. फिर्यादी सीमा तुकाराम निकम (४७, रा. पार्वतीनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्या घाटीमध्ये कक्ष सेविका म्हणून नोकरीला आहेत. रविवारी सायंकाळी घरी असताना त्यांच्या शेजारी राहणारी रजनी ठाकूर हिला त्यांची ओमानी अॅम्ब्युलन्स गाडी ही आमच्या दारासमोर लावू का, अशी विचारणा केली.
तेव्हा रजनी यांनी गाडी लावण्यास नकार देत सार्वजनिक रस्त्यावर गाडी दारासमोर लावायची नाही, असे म्हणत वाद घातला. त्यानंतर रजनीने केस धरून सीमा यांना तिच्या घरात ओढत नेले. पोलिसांच्या फायबरच्या काठीने जबर मारहाण केली. माझा नवरा पोलिस आहे, आमच्या नादी लागायचे नाही, अन्यथा तुला जिवे मारेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.