Sambhajinagar Crime : अर्ध्या रस्त्यातून नवरी पसार, साताऱ्याच्या तरुणाची फसवणूक; साथीदारांनी गाडी अडवून केली मारहाण

एजंटमार्फत १ लाख ८० हजारांत लग्न ठरल्यानंतर साताऱ्याचा तरुण लग्नासाठी न्यायालयात सायंकाळी नोटरी करून लग्न केले.
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : अर्ध्या रस्त्यातून नवरी पसार, साताऱ्याच्या तरुणाची फसवणूक; साथीदारांनी गाडी अडवून केली मारहाण File Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Satara youth cheated Marriage Fraud

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

एजंटमार्फत १ लाख ८० हजारांत लग्न ठरल्यानंतर साताऱ्याचा तरुण लग्नासाठी न्यायालयात सायंकाळी नोटरी करून लग्न केले. नवरीला घेऊन वाळूजपर्यंत जाताच नवरीचे साथीदार एका वाहनातून आले. त्यांनी नवरी जाणाऱ्या गाडीची काच फोडून चालकाला मारहाण करत नवरी आणि तिच्या टोळीने रोख रक्कम, कागदपत्रांची बॅग आणि मोबाईल पलायन केल्याने तरुणाची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

Sambhajinagar Crime
Uttarakhand Cloudburst | संभाजीनगरचे १८ भाविक सुखरूप

एजंट नंदकुमार चव्हाण (५५, रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा), सात मोनिका मावशी आणि नवरी दिशा माधव कदम (२५, रा. आंबेडकरनगर) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी महेश शहाजी यादव (३९, रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे शेतकरी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जुलै रोजी एजंट नंदकुमार चव्हाण त्यांच्या घरी आला. त्याने छत्रपती संभाजीनगर येथे लग्नासाठी दिशा कदमचे स्थळ सुचविले. दिशाचा फोटो दाखविल्यानंतर मुलगी पसंत पडल्याने यादव यांनी लग्नास होकार दिला.

रात्री साडेआठच्या सुमारास महेश यांच्यासह त्याचे कुटुंब दिशाला घेऊन जात असताना रात्री ८:३० वाजता वाळूज जवळ एका चारचाकी वाहनाने त्यांची ओमिनी कार अडवली. त्यातून उतरलेल्या आरोपींनी महेश यांच्या कारची काच फोडून चालकाला डोक्यात मारून जखमी केले.

Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात फळबाग क्षेत्रात बुरशीजन्य रोगांचा प्रकोप

त्यानंतर आरोपी मोनिका (रा. सिडको) हिच्याशी फोनवर लग्नाविषयी बोलणी झाली. तिने यादव यांच्याकडे १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केल्याने त्यांनी देण्यास होकार दिला. २९ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास महेश यादव हे चुलत भाऊ शैलेश, समाधान पिसाळ, बाळू यादव आणि एजंट चव्हाण सोबत संभाजीनगरकडे वाहनाने निघाले. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास काळा गणपती मंदिर, सिडको भागात पोहोचले. सायंकाळी ५:३० वाजता मोनिका त्यांना आंबेडकरनगर येथे दिशाच्या घरी घेऊन गेली. सर्वांनी तिथे चहा घेतल्यानंतर सर्वजण औरंगपुरा भागात साड्या खरेदीसाठी गेले. दुकानातून साड्या घेतल्यानंतर कौटुंबिक न्यायालयात आले.

नोटरीवर लावले लग्न

कौटुंबिक न्यायालयात एका वकिलाकडे घेऊन गेले. तिथे नोटरी बनवून महेश आणि दिशा यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन लग्न लावण्यात आले. वकिलाला महेश यांनीच फोन पे नंबर ९८२२०५१७०७ यावर ५ हजार रुपये पाठवले.

वाहनात बसल्यानंतर मोनिका मावशीला महेश यांनी एजंट नंदकुमार समोर रोख १ लाख रुपये तर क्यूआर कोडवर ७५ हजार पाठवले. त्यानंतर दिशा कदम, तिची गुरुबहीण असे महेश यांच्यासोबत जाण्यासाठी त्यांच्या वाहनात बसल्या.

साथीदारांसोबत पळाली

एजंट नंदकुमारचा मोबाईल, चावी, महेश यांचे लग्नाची कागदपत्रे, ३५ हजार असलेली बॅग दिशा कदम हिने घेऊन तिच्या साथीदारांसोबत पळून गेली. याप्रकरणी वाळूज ठाण्यात शनिवारी (दि.२) तक्रार देण्यात आली होती. यादव यांनी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेत मंगळव-घेऊन ारी (दि.५) गुन्हा दाखल केला. अधिक तपास जमादार शेवाळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news