Railway : रेल्वे प्रवासी उत्पन्नात संभाजीनगर ९ व्या स्थानी

तब्बल १०४ कोटींचे विक्रमी उत्पन्न
railway
railway pudhari photo
Published on
Updated on

Sambhajinagar ranks 9th in railway passenger revenue

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वे विभागातील प्रवासी उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रमुख रेल्वेस्थानकांच्या यादीत छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाने उल्-लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान प्रवासी महसूलातून १,०४,५६,५४,९१९ रुपये (१०४.५६ कोटी रुपये) उत्पन्न मिळवत छत्रपती संभाजीनगर स्थानकाने नववा क्रमांक पटकावला आहे.

railway
Sambhajinagar News : सदस्यांच्या आक्रमकतेपुढे विद्यापीठ प्रशासन बॅक फुटवर

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या टॉप-१० महसूल उत्पन्न करणाऱ्या स्थानकांच्या यादीत समावेश झाल्याने मराठवाड्याच्या रेल्वे वाहतुकीचे वाढते महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. शहराचासोयीसुविधांना गती प्रवासी महसूल वाढल्यामुळे भविष्यात स्थानकावरील सुविधा, प्लॅटफॉर्म सुधारणा, प्रवासी सोयीसुविधा आणि रेल्वे सेवांच्या विस्ताराला गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वाढते उत्पन्न हे शहराच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी सकारात्मक संकेत आहेत. येणाऱ्या काळात येथून नवीन रेल्वेसह कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देण्याचीही अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

railway
जिथे पोलिसांनाच मदत मिळेना तिथे सर्वसामान्यांचे काय ?

प्रवासी संख्येत वाढ

छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन, उद्योग आणि शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अजिंठा-वेरूळ लेणी, धार्मिक स्थळे तसेच औद्योगिक व व्यापारी प्रवासामुळे स्थानकावरील तिकीट विक्रीतही झपाट्याने वाढ झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली.

टॉप-१० मध्ये स्थान

या यादीत सिकंदराबाद, विजयवाडा, तिरुपती आणि काचेगुडा यासारखी मोठी जंक्शन स्थानके अव्वल स्थानी असताना छत्रपती संभाजीनगरने टॉप-१० मध्ये स्थान मिळवले. येथून म्हणावी तेवढी कनेक्टिव्हिटी नसतानाही ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. मराठवाड्यातील इतर स्थानकांच्या तुलनेत येथे प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news