जिथे पोलिसांनाच मदत मिळेना तिथे सर्वसामान्यांचे काय ?

हायकोर्ट सिग्नलवर वाहतूक पोलिसाला मारहाण; भररस्त्यात दाम्पत्याचा राडा, मदतीसाठी पुंडलिकनगर पोलिसांची तासभर दांडी
sambhajinagar news
जिथे पोलिसांनाच मदत मिळेना तिथे सर्वसामान्यांचे काय ?file photo
Published on
Updated on

Traffic policeman beaten up at High Court signal; Couple riots on busy road

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील अतिशय गजबजलेल्या हायकोर्ट सिग्नलवर एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी (दि.२२) दुपारी दुपारी ४:३० ते ५:३० वाजेदरम्यान घडला. तुम्हाला उडवून देईन, अशा धमक्या देत या राडेबाजाने भररस्त्यात नागरिकांसमोर पोलिसांचा उद्धार केला.

sambhajinagar news
Siddhartha Udyan : धोकादायक बनले सिद्धार्थ उद्यान

विशेष म्हणजे, डायल ११२ आणि कंट्रोल रूमला कॉल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मदत पोहोच करण्याचा दावा पोलिसांकडून केला जातो. मात्र येथे वाहतूक पोलिसांनी वारंवार कॉल करूनही मदतीसाठी पुंडलिकनगर पोलिस तब्बल तासभर फिरकले नाहीत.

सोमनाथ मुरलीधर गिरी (२७, रा. विजयनगर, मूळ नेवासा) आणि त्याची पत्नी अशी आरोपींची नावे आहेत. प्रत्यक्षदर्शीन दिलेल्या माहितीनुसार, सिडको वाहतूक शाखेचे अंमलदार रावसाहेब पाचलोरे हे २२ फेब्रुवारी रोजी हायकोर्ट सिग्नलवर वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते.

दुपारी ४:३० च्या सुमारास संशयित आरोपी सोमनाथ गिरी हा आपल्या दुचाकीवरून (एमएच १७-सिक्यू-६७४२) डिव्हायडरच्या अगदी जवळून गाडी चालवत असताना पाचलोरे यांनी त्याला थांबवले. मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून विचारणा केली असता, त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याने फोन करून पत्नीला घटनास्थळी बोलावून घेतले. त्याने वाहतूक शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत अश्लील शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरू केली.

sambhajinagar news
Sambhajinagar News : सदस्यांच्या आक्रमकतेपुढे विद्यापीठ प्रशासन बॅक फुटवर

इतक्यावरच न थांबता त्याने मोबाईलवरून फोनाफोनी केली आणि तुला उडवतोच, अशा धमक्या देत पोलिसांच्या अंगावर धावून गेला. अनेक नेत्यांची नावे घेत दमदाटी करू लागला. अनेकदा त्याने पोलिसांवर हातही उगारला. याप्रकरणी अंमलदार पाचलोरे यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ गिरी आणि त्याची पत्नी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम १३२ (शासकीय कामात अडथळा), ११५ (२), ३५२, ३५१(२), १२६ (२), २८५, ३(५) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसाच्या कानशिलात मारली

दोन्ही पती-पत्नीने मिळून उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना तुम्हाला दोन दिवसांत बघून घेतो, अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर आरोपी गिरीने पोलिस अंमलदार पाचलोरे यांच्या गालावर जोरात चापट मारली. त्यानंतर आरोपी गिरी हा थेट रस्त्यावर झो-पून गेला, ज्यामुळे काही काळ वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.

बुलेटस्वारांचाही अधिकाऱ्याशी वाद

दुपारी १ वाजेच्या सुमारास वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी फटका सायलेन्सर बुलेटस्वार तरुणांना पकडले. मात्र या तरुणांनी वाहतूक पोलिसांसोबत अधिका-यांशीही हुज्जत घातली. सुमारे १५ मिनिटे हा वाद सुरू होता. तेव्हा त्या तरुणांनी आणखी दोघांना बोलावून घेतले. त्यानंतर वाद वाढतच गेला. अखेर पोलिसांनी बुलेट जप्त करून कारवाई केली.

गावगुंडांची हिम्मत वाढली पोलिसांनाच भररस्त्यात धमकावण्याचे धाडस या गावगुंडांमध्ये येतेच कोठून, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. तसेच आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल ११२ च्या कार्यक्षमतेवरही या घटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून डायल ११२ आणि पोलिस नियंत्रण कक्षाला वारंवार मदतीची विनंती केली. मात्र पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातून कोणीही वेळेवर पोहोचले नाही. अखेर तासाभरानंतर पुंडलिकनगर ठाण्याची टू मोबाईल व्हॅन घटनास्थळी आली. या राडेबाजाला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news