Sambhajinagar News : सदस्यांच्या आक्रमकतेपुढे विद्यापीठ प्रशासन बॅक फुटवर

सभागृहाला प्रशासनाने चुकीची माहिती दिल्याचा सदस्यांचा आरोप
Sambhajinagar News
Sambhajinagar News : सदस्यांच्या आक्रमकतेपुढे विद्यापीठ प्रशासन बॅक फुटवरfile photo
Published on
Updated on

University administration on back foot in the face of members' aggression

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आमसभेत विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे, विविध प्रश्नांवर चुकीची उत्तरे व सदस्यांना कुलगुरुंनी वापर-लेल्या अपशब्दाबाबत शनिवारी (दि. २१) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेताच विद्यापीठ प्रशासन बॅकफुटवर जात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, तसेच चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत बैठक उरकण्याचा प्रयत्न केला.

Sambhajinagar News
Railway News : एकाच महिन्यात २१ हजार फुकट्यांवर रेल्वेची कारवाई

सदस्य संजय कांबळे यांनी कुलगुरुंना विविध प्रश्नांवर चांगलेच घेरले. यावेळी सदस्यांना अपशब्द वापरल्याचाही उल्लेख कांबळे यांनी केला. दरम्यान, याला कुलगुरुंनी बगल देत इतर विषयांवर चर्चा वळवली. त्यानंतर कांबळे यांनी विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे आणि सदस्यांना दिलेल्या नोटीसबाबत विचारले असता, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल नाहीत तर ते आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर दाखल केल्याची सावरासावर प्रशासनांकडून करण्यात आली.

या उत्त् ाराने सदस्यांचे समाधान झाले नाही. विद्यापीठ प्रशासनाने ग्रामीण भागातील शिक्षण संपवण्यावा डाव आखल्याचा आरोप केल्यानंतर प्रशासन विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन कुलगुरुंनी दिले. खिल्लारे, उमकांत राठोड व संजय कांबळे यांनी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात अनेक त्रुटी असून, त्यात मार्गदर्शनानुसार सुधारणा करा अन्यथा आम्ही अर्थसंकल्प फेटाळून लावू, असा पवित्रा घेतला, त्यामुळे घाबरलेल्या प्रशासनाच्या मदतीला इतर सदस्य धावून येत विद्यापीठाची बदनामी होईल, अशी भीती दाखवत अर्थसंकल्पाचा विरोध करू नये, अशी भूमिका इतर सदस्यांनी घेतल्यानंतर गोंधळातच अर्थसंकल्प मंजूर केला.

Sambhajinagar News
Siddhartha Udyan : धोकादायक बनले सिद्धार्थ उद्यान

चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई

सदस्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर चुकीचे दिल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला. यावर चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईसाठी सदस्य आक्रमक झाले. हे पाहून प्रशासनाने तात्काळ तिघांची समिती नेमून यावर येत्या पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे प्रशासनाच्या वतीने सभागृहाला सांगण्यात आले.

गोट्या खेळायला आलो का?

उर्दू आणि पार्शियन विभागातील प्रवेशासंदर्भातील मदरस्यातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना समकक्षता देण्यासंदर्भातील मुद्द्द्यावर जहूर शेख यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शेखच्या मदतीला हरिदास सोमवंशी डॉ. नरेंद्र काळे, सुनील मगरे धावून येत प्रशासन सभागृहात चुकीची माहिती आणि गोलमोल उत्तर देत आहे. आम्ही येथे गोट्या खेळायला येतो का, अशा शब्दांत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news