

Sambhajinagar Rakhi prices increase by 20 to 25 percent
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिना लागताच सणांची रेल-चेल सुरू होते. बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र यंदा भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणारी राखी यंदा २० ते २५ टक्क्यांनी महागली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
रक्षाबंधननिमित्त शहरातील बाज-ारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. भाऊरायाच्या पसंतीस उतरेल अशी राखी घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती, तर दुसरीकडे आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना युवावर्ग दिसत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त विविध बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत.
महिलांना या राख्या भुरळ घालत आहे. बहीण- भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन ९ ऑगस्टला साजरा होणार आहे. मात्र यंदा महागाईमुळे दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे राख्या विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. कमीतकमी पाच ते दहा रुपयांपासून ५५० ते ६०० रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या राख्या रक्षाबंधननिमित्त बाजार-पेठेत उपलब्ध आहेत. महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे.
यंदा राख्यांची मागणी वाढली आहे. यावर्षी राख्यांच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे. मात्र तरीही राखी खरेदीसाठी महिलावर्ग दुकानात गर्दी करत आहेत. त्यामुळे यावर्षीही बाजारपेठेत सर्वत्रच उत्साहाचे वातावरण आहे.