

436 more polling stations for Zilla Parishad elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगामी जिल्हा हजार ५८७ मतदार राहणार असून, मतदान केंद्रांची एकूण संख्या ही २३९६ इतकी असणार आहे. मतदारांची वाढलेली संख्या आणि एका मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त ९०० मतदारांची घालून दिलेली मर्यादा यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात मागील वेळीपेक्षा मतदान केंद्रांची संख्या तब्बल ४३६ ने वाढणार आहे.
जिल्ह्यात यावेळी एकूण १८ लाख ७० राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात सर्व जिल्हा प्रशासनांच्यावतीने आपापल्या जिल्ह्यातील मतदार, प्रस्तावित मतदान केंद्र यांची सविस्तर माहिती सादर केली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ च्या मतदारयाद्या अंतिम असणार आहे. याशिवाय आतापर्यंत एकेका मतदान केंद्रावर सरासरी हजार ते बाराशे मतदार होते. परंतु मतदानासाठी मतदारांना ताटकळ थांबावे लागू नये म्हणून यावेळी निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त नऊशे मतदारच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे, मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी जिल्ह्यात १९६० मतदान केंद्र होते. परंतु आता आयोगाचे निर्देश आणि जिल्ह्यातील मतदारसंख्या या दोन्ही कारणांमुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २३९६ वर गेली आहे. आगामी निवडणुकीसाठी एकूण १८ लाख ७० हजार ५८७ मतदार या केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील.
निवडणुकीच्या तुलनेत यावेळी कन्नड तालुक्यात सर्वाधिक ७९ मतदान केंद्र वाढले आहेत. त्यापाठोपाठ गंगापूर तालुक्यात ७७, वैजापूर तालुक्यात ६९, फुलंब्री तालुक्यात ५०, पैठण तालुक्यात ४१. सोयगाव तालुक्यात ३५, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३०, खुलताबाद तालुक्यात २८ आणि सिल्लोड तालुक्यात २७ मतदान केंद्र वाढले आहेत. जिल्ह्यात मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती