Chhatrapati Sambhajinagar potholes : शहरातील खड्डे बुजवण्यासाठी मनपाचा ९० लाखांचा प्रस्ताव

१४ जुलैच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवणार अंदाजपत्रक
Chhatrapati Sambhajinagar potholes
Chhatrapati Sambhajinagar potholespudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांत जलवाहिनी, ड्रेनेज आणि गॅसलाईन टाकण्याच्या कामांनंतर रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती न झाल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या प्रश्नावर अखेर महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शहरभरातील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ९० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, १४ जुलै रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. मंजुरी मिळाल्यास निविदा प्रक्रिया राबवून तातडीने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी (दि.१०) मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे दिलेले उद्दिष्ट कंत्राटदार कंपनीने पूर्ण केले आहे. यासह काही भागांमध्ये ड्रेनेज प्रकल्पाची लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी खड्डे खोदण्यात आले. तसेच गॅस पाईपलाईनसाठी अनेक भागांतील रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक भागांत मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता आणखी वाढली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Chhatrapati Sambhajinagar potholes
Sambhajinagar News : खोदलेल्या रस्त्यांवरील पॅचवर्कसाठी महापालिकेचे कंत्राटदारांना आदेश

अनेक ठिकाणी वाहतूक धोकादायक बनली असून, अपघातांचाही धोका वाढला आहे. दरम्यान, ६ जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावेळी सभापती अनिल मकरिये यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत शहरातील सर्व खड्डे चार दिवसांत बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने नवीन तंत्रज्ञानाच्या वाहनाद्वारे खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू केली.

या मोहिमेत शहरातील अनेक भागांतील खड्डे बुजवण्यात आले. मात्र पावसाच्या पाण्यामुळे मिश्रण टिकत नसल्याने काही ठिकाणचे खड्डे तसेच आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी महापालिकेकडून २० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. य अंदाजपत्रकाला १४ जुलैच्य सर्वसाधारण मिळाल्यानंतर शहरातील विविध भागांत पॅचवर्कची कामे सुरू केल जाणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar potholes
Nashik Municipal Corporation | विधिमंडळात आमदारांकडून नगरसेवकांवर पलटवार

चार वेळा बुजवला व्हीआयपी मार्गावरील खड्डा

व्हीआयपी मार्गावरील लेबर कॉलनीजवळील रस्त्यावर निर्माण झालेला खड्डा महापालिकेकडून आतापर्यंत चारवेळा बुजवण्यात आला, मात्र पाऊस सुरू असल्याने व खड्ड्यातील गाळामुळे डांबरमिश्रित मिश्रण टिकले नाही. त्यामुळे त्या ठिकाणचा खड्डा तसाच आहे. त्यावर आता फ्रँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news