Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबात दबक्‍या पावलांनी बछड्यांनी गव्याला घेरलं...पण प्रयत्‍न फसला..शेवटी वाघिणीनं एका पंजात केली शिकार

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ दृश्य समाज माध्यमावर व्हायरल
Tadoba Andhari Tiger Reserve
Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबात दबक्‍या पावलांनी बछड्यांनी गव्याला घेरलं...पण प्रयत्‍न फसला..शेवटी वाघिणीनं एका पंजात केली शिकारFile Photo
Published on
Updated on

Indian bison hunted by tiger in Andhari Tiger Reserve

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवन प्रेमींना पुन्हा एकदा थरारक आणि दुर्मिळ असा अनुभव मिळाला आहे. मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील जुनोना बफर झोनमध्ये नोंद झालेल्या या घटनेने पर्यटकांचे लक्ष वेधले असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Tadoba Andhari Tiger Reserve
Chandrapur Accident : भरधाव ट्रॅक्टरखाली सापडून १५ वर्षाचा मुलगा ठार

थरारक दृश्याची सुरुवात

गवा रेड्याच्या शिकारीची ही घटना जुनोना बफर झोनमधील असल्याचे सांगितले जात आहे. एका गवा रेड्याचे कुरणात शांतपणे चरणे सुरू होते. तिथे तीन वाघाचे बछडे शिकारीसाठी हळूहळू तिच्या दिशेने सरकू लागले. जंगलातील निसर्गनियमाप्रमाणे शिकारीसाठी ही एक नैसर्गिक प्रक्रिया होती. बछड्यांनी गवा रेड्याला हेरले आणि त्‍याच्यावर वारंवार झडप घालण्याचा प्रयत्न केला.

Tadoba Andhari Tiger Reserve
Chandrapur News | चंद्रपुरात अवैध दारू निर्मिती, विक्रीविरोधात कठोर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

बछड्यांचा प्रयत्‍न फसला...

या बछड्यांनी एकापाठोपाठ एक प्रयत्न करून गवा रेड्याला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र अनुभवाच्या अभावामुळे त्यांना यश मिळाले नाही. गवा रेड्याने आपल्या ताकदीचा वापर करून त्यांना पिटाळून लावले. गवा रेड्याने शिकारीचा प्रसंग हाणून पाडला. या काळात जंगलातील वातावरण अत्यंत थरारक झाले होते. या दृश्याचा काही पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभव घेतला.

Tadoba Andhari Tiger Reserve
Chandrapur Railway Collision Bear | रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

वाघिणीचे आगमन अन्...

या प्रयत्नांदरम्यान काही वेळाने बछड्यांची आई  एक वाघीण घटनास्थळी पोहोचली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तिनेही गवा रेड्यावर झडप घातली. परंतु तिचाही प्रयत्‍न गवा रेड्याने हाणून पाडला. यानंतर मात्र शिकारीत अनुभवी वाघिनीने अत्यंत कुशलतेने गवा रेड्याची शिकार केली आणि बछड्यांसमवेत शिकारीवर यथेच्च ताव मारला.

व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल

या शिकारीच्या दृश्याचा काही पर्यटकांनी व्हिडिओ चित्रीत केला. जंगलातील नैसर्गिक शिकारीची ही प्रक्रिया पाहणे हे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला. या व्हिडिओने समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला असून, निसर्गप्रेमी आणि वन्यजीवन अभ्यासकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अत्यंत दुर्मिळ असलेली ही घटना पर्यटन प्रेमींना आता समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मात्र अद्यापही हा व्हिडिओ ताडोबातीलच आहे याची पुष्टी वनविभागाने केलेली नाही.

वन्यजीवनातील नैसर्गिक चक्राचे दर्शन

ही घटना वन्यजीवनातील शिकारीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा घटना पाहणं हे केवळ मनोरंजन नसून, नैसर्गिक परिसंस्थेतील संतुलन कसे राखले जाते याचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना घेता आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news