

Sambhajinagar News: Three people assaulted with an iron bracelet worn on the wrist
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : काही एक कारण नसताना हातातील लोखंडी कडे तिघांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी करण्यात आल्याची घटना वडगाव को. येथे घडली.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार वाघ (१९ रा. निरंकारनगर, वडगाव को.) त्याची आई चंद्रकला वाघ हे मंगळवारी घरी असतांना कल्याण पतंगे व ईश्वर लघाने (दोघे रा. वडगाव को.) यांनी त्याठिकाणी येऊन काही एक कारण नसताना माय-लेकाला तसेच शांताबाई मानकर, रमेश मानकर मारहाण सुरू केली.
यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी कडे तुषार त्याची आई चंद्रकला व शांताबाई यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. या प्रकरणी तुषार वाघ याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात कल्याण पतंगे व ईश्वर लघाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.