Sambhajinagar News : खड्ड्यांतच स्विमिंग पूल, काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

मिल कॉर्नर येथे प्रतीकात्मक उद्घाटन : मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : खड्ड्यांतच स्विमिंग पूल, काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलनfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News : Swimming pool in pits, Gandhigiri movement of Congress

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसकडून बुधवारी (दि.५) मिल कॉर्नर येथे गांधीगिरीच्या माध्यमातून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्याला महापालिकेचा स्विमिंग पूल असे संबोधत त्याचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. तर वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन वेलकम टू स्मार्ट सिटी, खड्डे बुजवा नागरिक वाचवा आणि रस्ते द्या, स्विमिंग पूल नको, अशा घोषणा देत मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

Sambhajinagar News
FDA : भेसळखोरांविरुद्धच्या कारवाईला ब्रेक

शहरातील खड्ड्यांवरून शहर काँग्रेसने गांधीगिरी करत बुधवारी मिल कार्नर भागात आंदोलन केले. शहर जिल्हाध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वात या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. तसेच दोन आठवड्यांपूर्वी महापौर समीर राजुरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन देऊनही रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी खड्याजवळ पुष्प अर्पण करून प्रतीकात्मक उद्घाटन केले. या आंदोलनामुळे परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले. यावेळी अॅड. सय्यद अक्रम म्हणाले, शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पाण्याने भरलेल्या खड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत.

Sambhajinagar News
Uday Samant : कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने अधिक तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

आंदोलनातील प्रमुख मागण्या...

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत.

तात्पुरत्या मुरूम टाकण्याऐवजी दर्जेदार दुरुस्ती करावी.

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करावे.

अपघात टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी त्वरित उपाययोजना कराव्यात.

मागण्या पूर्ण न झाल्यास काँग्रेसकडून तीव्र जनआंदोलनाचा इशारा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news