

Sambhajinagar News: Employees halt work; silence at the Additional Tehsildar's office
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अप्पर तहसील कार्यालयात गुरुवारी (दि. २०) दुपारी कर्ज प्रकरणातील जप्तीच्या कारवाईवरुन दिव्यांग लिपिकाला वकिलाने आरेरावी करीत मारहाण केली. या घटनेनंतर कार्यालयातील सर्व सिटीचौक पोलिस ठाण्यात कार्यालयात शुकशुकाट होता. महिनाभरातील ही दूसरी घटना असल्याने कार्यालयातच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांनी काम बंद करीत महिनाभरातील धाव घेतली. त्यामुळे दुपारनंतर दुसरी घटना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शहराचे अप्पर आणि संभाजीनगर तालुक्याचे ग्रामीण तहसील कार्यालय आहे. सध्या या दोन्ही कार्यालयांमध्ये कामाचा ताण वाढला आहे. त्यात सहकारी बँकाच्या कर्ज प्रकरणातील जप्तीचे आणि इतरही कामे तहसील कार्यालयातूनच होतात. गुरुवारी (द. २०) दुपारी एका बँकेच्या कर्ज प्रकरणात मालमत्ता जप्तीची प्रक्रिया करण्यासाठी बँकेचे कर्मचारी वकिलासह अप्पर तहसील कार्यालयात दाखल झाले.
परंतु, तहसीलदार उमेश पाटील हे शासकीय कामानिमित्ताने मुंबईत मंत्रालयात होते. तर ज्या मंडळात हे काम होते. त्या मंडळ अधिकारी अभिलाषा म्हस्के या एसआयआरच्या कामानिमित्ताने निवडणूक विभागात होत्या. त्यामुळे अप्पर तहसील कार्यालयातून वकील बॉबी अग्रवाल यांना उद्या कारवाईसाठी यावे, अशी सूचना तहसील कार्यालयातून करण्यात आली.
त्यावरुन दिव्यांग लिपिक विजय सरवर पाटील व वकील यांच्यात वाद झाला. त्यानंतर वकिलाने सरवर यांना मारहाण केली. त्यामुळे संपूर्ण कर्मचारी संतापले. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट करीत काम बंद केले. त्यानंतर सर्व कर्मचारी तहसीलदारांच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण होताच अप्पर तहसीलमधील सर्व कर्मचारी काम बंद करून सिटीचौक पोलिस ठाण्यात गेले. त्यामुळे कार्यालयात असा शुकशुकाट होता. आदेशानंतर सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल झाले. यामुळे कार्यालयात गुरुवारी दुपारनंतर शुकशुकाट होता.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
मागील महिनाभरापासून अप्पर तहसील कार्यालयात वादावादीच्या घटना घडत आहेत. कार्यालयात कामानिमित्ताने येणारे नागरिक अधिकारी-कर्मचाऱ्यांशी आरेरावी करीत आहेत. गेल्या महिन्यात २१ जुलै रोजी एका बिल्डरने अशीच आरेरावी केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे होत नाही तोच गुरुवारी (दि. २०) दिव्यांग कर्मचारीला आरेरावी आणि मारहाण झाली. त्यामुळे कार्यालयातच महसुल कर्मचारी सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे.
हिंगोलीत तलाठ्याचा खून
दोन वर्षांपूर्वीच हिंगोलीतील ग्राम महसूल अधिकारी संतोष पवार यांच्यावर कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला होता. यात पवार हे मरण पावले होते. या घटनेने राज्यभरातील महसूल विभागात खळबळ माजली होती.