Crime News : अप्पर तहसील कार्यालयात दिव्यांग अधिकाऱ्याला बेदम मारहाण

जालन्याच्या दोन तरुणांचा राडा ; सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल
sambhajinagar news
Crime News : अप्पर तहसील कार्यालयात दिव्यांग अधिकाऱ्याला बेदम मारहाणFile Photo
Published on
Updated on

Disabled officer brutally beaten up in Upper Tehsil office

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बँकेने जप्त केलेल्या घराचा ताबा मिळवण्यासाठी अप्पर तहसील कार्यालयात आलेल्या जालन्याच्या दोघांनी एका दिव्यांग सहायक महसूल अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.२०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. व्यंगावर आक्षेपार्ह बोलून तुझा याच्याशी काही संबंध नाही, तुझी नोकरीच खाऊन टाकीन, अशी धमकी देत या दोघांनी अधिकाऱ्याला त्यांच्याच काठीने मारण्याची धमकी दिली आणि डोक्यात ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली.

sambhajinagar news
Sambhajinagar News : समाजाने दखल घ्यावी असे काम सर्व शिक्षकांनी करावे : राज्यपाल बागडे

या मारहाणीत अधिकाऱ्याच्या डोक्याला आणि मेंदूला मार लागला असून, त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉबी राधेशाम अग्रवाल आणि अनिकेत कृष्णा भंडारी (दोघे रा. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी विजय चंद्रभान सरोवर (४८, रा. पडेगाव) यांच्या तक्रारीनुसार, ते गुरुवारी (दि. २०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास अप्पर तहसील कार्यालयात त्यांचे सहकारी नायब तहसीलदार अरुण पहुरे, जितेंद्र जाधव, रामदास मोगल आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत शासकीय कामकाज करत होते.

sambhajinagar news
Sambhajinagar News : जि.प.च्या मालमत्तेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

तेवढ्यात आरोपी बॉबी अग्रवाल आणि अनिकेत भंडारी तिथे आले. बँकेने वडगाव कोल्हाटी येथे जप्त केलेले घर ताब्यात द्यायचे आहे, तुम्ही आमच्यासोबत चला, अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. यावर सरोवर यांनी त्यांना समजावून सांगितले की, या जप्तीच्या कारवाईसाठी मंडळ अधिकारी अभिलाषा म्हस्के आणि नायब तहसीलदार यांची नेमणूक झाली असून, म्हस्के या शासकीय कामासाठी बाहेर गेल्या आहेत.

कारवाईसाठी दोन्ही अधिकारी हजर असणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमांची माहिती दिल्यावर आरोपी बॉबी अग्रवाल याने अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केली. मंडळ अधिकारी आहे की नाही याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, तुम्हाला यावेच लागेल असे म्हणत त्याने सरोवर यांना त्यांच्या व्यंगावर वारंवार बोलून अपमानित केले. तुझी काठी घेऊन तुझ्याच डोक्यात मारीन, अशी धमकीही त्याने दिली.

मेंदूला दुखापतः सीटी स्कॅनचा सल्ला

या घटनेनंतर विजय सरोवर यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. मारहाणीमुळे त्यांच्या मेंदूला दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.

मोबाईलमध्ये शूटिंग करण्यास मज्जाव

करताच मारहाण आरोपी अनिकेत भंडारी हा या प्रकाराचे मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत होता. शासकीय कार्यालयात शूटिंग करण्यास सरोवर यांनी मज्जाव केला असता, अनिकेतने त्यांना धक्का देऊन शिवीगाळ केली आणि ठोशा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बॉबी अग्रवालनेही त्यांच्या डोक्यात मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत सरोवर यांची सुटका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news