Sambhajinagar News : जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे

देशात प्रथमच झऱ्याची प्रगणना
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरेfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar News: 12 living springs found in the district

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या वतीने देशात प्रथमच झऱ्यांची प्रगणना करण्यात आली. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२ ठिकाणी जिवंत झरे आढळून आले आहेत. सर्वाधिक ५ नवीन झरे हे सिल्लोड तालुक्यात आढळले आहेत. या झऱ्यांच्या ठिकाणी पर्यटन विकासाच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

Sambhajinagar News
Beed Hailstorm : बीड जिल्ह्याला अवकाळीचा भीषण तडाखा

केंद्रीय जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने देशातील झऱ्याची गणना कार्यक्रम हाती घेतला होता. देशाच्या पर्वतीय आणि डोंगराळ भागांमध्ये जलसुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी झऱ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन हा कार्यक्रम आखण्यात आला. महाराष्ट्रातही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून नुकतीच झऱ्यांची गणना करण्यात आली.

त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार तालुक्यांत १२ नवीन जिवंत झरे आढळून आले. आता या झऱ्यांची ठिकाणे पर्यटनस्थळात बदलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नीती आयोगाच्या अहवालानुसार, देशातील सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. पर्वतीय भागात, गावे, वस्त्या स्थानिक कड्यावर स्थित असतात.

Sambhajinagar News
Sambhajinagar bus fire : धुळे-संभाजीनगर हायवेवर एसटी बस जळून खाक

अशा ठिकाणी ग्रामीण समुदायांच्या पिण्याच्या आणि घरगुती पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक झरे हा एकमेव स्रोत आहे. झऱ्याचे महत्त्व लक्षात घेता २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जल सुरक्षेसाठी हिमालयातील झऱ्यांचे इन्व्हेंटरी अँड रिव्हायव्हल ऑफ वॉटर सिक्युरिटी या एनआयटीआय आयोगाच्या कार्य गटद्वारे झऱ्याची मॅपिंग प्रगणना आयोजित करण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला होता.

कुठे आढळले जिवंत झरे ?

जिल्ह्यात कन्नड, खुलताबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यात नवीन झरे आढळले आहेत. कन्नड तालुक्यात भिलदरी गावात २ ठिकाणी, खुलताबाद तालुक्यात ममनापूर आणि कनकशीळ येथे प्रत्येकी एक आणि वेरूळ येथे २ झरे आढळले आहेत. फुलंब्री तालुक्यात मारसावळी येथे एक झरा आढळला आहे. सिल्लोड तालुक्यात वडाळी येथे २, बाळापूर, पालोड आणि पिंपळदरी येथे प्रत्येकी १ झरा आढळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news