Sambhajinagar bus fire : धुळे-संभाजीनगर हायवेवर एसटी बस जळून खाक

प्रवासी जेवणासाठी खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला
Sambhajinagar bus fire
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारात शहादा-संभाजीनगर बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाली. (छाया: सुनील मरकड)
Published on
Updated on

खुलताबाद : छत्रपती संभाजीनगर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारात मंगळवारी (दि.10) दुपारी एसटी बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. शहादा डेपोची शहादा-संभाजीनगर ही बस आमपाली हॉटेलसमोर थांबलेली असतानाच अचानक पेट घेतल्याने काही क्षणातच बस जळून खाक झाली. सुदैवाने प्रवासी जेवणासाठी खाली उतरलेले असल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शहादा डेपोची बस शहादा येथून प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास चालक व वाहकाने बस पळसवाडी येथील आमपाली हॉटेलवर जेवणासाठी थांबवली. प्रवासी खाली उतरून काही वेळही झाला नव्हता, तोच बसमधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात आगीने भीषण रूप धारण केले.

Sambhajinagar bus fire
Chatrapati Sambhajinagar industry crisis : छत्रपती संभाजीनगरात 90 टक्के कंपन्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार!

आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलवरील नागरिक आणि प्रवाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीच्या ज्वाला इतक्या तीव होत्या की काही वेळातच बसचे मोठे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले की, आम्ही जेवणासाठी खाली उतरलो आणि काही वेळातच बसला आग लागली. ही घटना धावत्या बसमध्ये घडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती.

बस ओव्हरहीट झाल्याचा अंदाज

प्राथमिक माहितीनुसार लांबच्या प्रवासामुळे बसच्या इंजिनमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन बस ओव्हरहीट झाली असावी. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Sambhajinagar bus fire
Ajanta Caves bee attack: अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा विदेशी पर्यटकांवर हल्ला; शंभरहून अधिकजण जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news