

Sambhajinagar Murder News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: घरी आल्यानंतर भावजीला पाहताच मेव्हण्याने डोक्यात लोखंडी पकडीने एकामागून एक घाव घालून भावजीची निघृण हत्या। केली. पत्नीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना रविवारी (दि.१९) सकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान उस्मानपुरा भागात घडली. संतोष काशिनाथ खाजेकर (३८, रा. म्हाडा कॉलनी, ता. गंगापूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
उस्मानपुरा पोलिसांनी आरोपी मेव्हणा बळीराम कल्याण जगधने (रा. रांजनगाव शेणपुंजी, ह.मु. उस्मानपुरा) याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली. मृत संतोष यांच्या मुलाच्या तक्रारीनुसार, तो घरी असताना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याच्या मामीने त्याला फोन करून सांगितले की, तुझे वडील हे रात्री माझ्या घरी मुक्कामी आले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक बळीराम ड्यूटीवरून घरी आले.
तेव्हा संतोष हे टेबल खाली लपले. मात्र बळीरामला ते दिसल्याने त्याचा राग अनावर झाला. संतोष यांना धक्काबुक्की करून खाली पाडले. लोखंडी पक्कडने संतोष डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर पत्नीवरही हल्ला करून सायकलने षच्या डोक्यात मारून ठार मारण्याच्या प्रयत्न केला, असे मामीने सांगितल्याने संतोष यांच्या मुलाने तात्काळ उस्मानपुरा गाठले. घरी जाऊन पाहिले तर वडील रक्ताच्या थरोळ्यात निपचित पडलेले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी संतोष यांना तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. आरोपी बळीरामला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.