

Sambhajinagar Municipal Corporation's efforts to quench the city's thirst
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा भर उन्हाळ्यात शहरात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई . आणि आठ ते दहा दिवसांआड मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले असताना महापालिका प्रशासनाने आता काही तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या तात्पुरत्या अॅक्शन प्लॅनमुळे शहराला दररोज १० ते १२ 1 एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.
र मात्र नवीन पाणीपुरवठा योजनेतून अपेक्षित 7 असलेल्या २०० एमएलडी पाण्यासाठी नागरिकांना . एप्रिलअखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, वे पारा चाळीशीकडे वाटचाल करत आहे. वाढत्या उष्णतेमुळे बोअरवेल आटल्या असून, नागरिक न पूर्णपणे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून न आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर समीर राजुरकर यांनी न पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेऊन 1 उपाययोजनांचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य जलवाहिन्यांवरील गॅप जोडणे, अनधिकृत नळजोडण्या तोडणे आणि प्रलंबित जलवाहिन्यांची कामे पूर्ण करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे.
सध्या शहराला १२०० मिमी योजनेतून ९० ते १०० एमएलडी, ७०० मिमी योजनेतून २८ ते ३० एमएलडी आणि ९०० मिमी योजनेतून २२ एमएलडी पाणी मिळत आहे. मात्र ७०० मिमीची जुनी योजना जीर्ण झाल्याने ती बंद करून ९०० मिमीची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या बदलामुळे शहराच्या पाणीपुरठ्यात १० ते १२ एमएलडीची वाढ अपेक्षित आहे. तसेच, ज्युबिली पार्क ते हनुमान टेकडी दरम्यानची सुजल निर्माण अभियानातील जलवाहिनी पूर्ण झाल्यास पाणीपुरवठ्यातील अंतर एक दिवसाने कमी होऊ शकते, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एप्रिलअखेर मिळणार पाणी !
२७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जायकवाडी येथील जॅकवेलची स्वच्छता पूर्ण झाली असून, १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंप सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिनीची टप्प्याटप्प्याने स्वच्छता (फ्लशिंग) करण्यासाठी किमान २५ ते ३० दिवस लागणार आहेत. त्यामुळे या योजनेचे वाढीव पाणी प्रत्यक्षात नागरिकांच्या नळाला येण्यासाठी एप्रिलअखेर उजाडण्याची शक्यता आहे.