Marathwada University : विद्यापीठात महिला डॉक्टर, विधी अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महिला वैद्यकीय अधिकारी तसेच विधी अधिकारी पद विद्यापीठ निधीतून कंत्राटी तत्त्वावर भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
Marathwada University : विद्यापीठात महिला डॉक्टर, विधी अधिकाऱ्यांची पदे भरली जाणारFile Photo
Published on
Updated on

Marathwada University: The posts of women doctors and legal officers will be filled in the university

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महिला वैद्यकीय अधिकारी तसेच विधी अधिकारी पद विद्यापीठ निधीतून कंत्राटी तत्त्वावर भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या दोन्ही पदांना मंजुरी देण्यात आली असून, १७ मार्च रोजी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
रेल्वे प्रवाशांचे दागिने लुटणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

विद्यापीठ परिसरात सध्या विविध वसतिगृहात ७५० हून अधिक विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यापीठ आरोग्य केंद्रात पूर्णवेळ महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची आवश्यकता होती. सध्या डॉ. आनंद सोमवंशी हे पूर्णवेळ आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, मात्र विद्यार्थिनींच्या संख्येनुसार महिला डॉक्टरांचे पद भरले जाणार आहे. तसेच, २०१८ पासून रिक्त असलेले विधी अधिकारी पदही आता भरण्यात येणार आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
तिरंग्याची रॅली, फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दुमदुमला

असे असेल भरतीचे स्वरूप :

महिला वैद्यकीय अधिकारी : ३०,००० रुपये (एकत्रित मासिक वेतन)

विधी अधिकारी : ७०,००० रुपये (एकत्रित मासिक वेतन)

मुलाखतीची तारीख : १७ मार्च २०२६

निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे (विद्यापीठ निधीतून कंत्राटी तत्त्वावर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news