Crime News : जुन्या पैशाच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

एन-११ हडको परिसरातील ठाकरे उद्यानासमोर जुन्या पैशाच्या देवाणघेव ाणीच्या वादातून एका तरुणाला चाकूने भोसकून चौघांनी प्राणघातक हल्ला केला.
Sambhajinagar Crime News
Crime News : जुन्या पैशाच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्लाFile Photo
Published on
Updated on

A young man was fatally attacked over an old money dispute.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एन-११ हडको परिसरातील ठाकरे उद्यानासमोर जुन्या पैशाच्या देवाणघेव ाणीच्या वादातून एका तरुणाला चाकूने भोसकून चौघांनी प्राणघातक हल्ला केला. सागर भारसकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Sambhajinagar Crime News
Crime News : जटवाडा रोडवर टोळक्याचा धुमाकूळ, तिघांवर चाकूहल्ला

शामराव कडमिंचे, सुनील कडमिचे, भोला कडर्मिचे (तिघेही रा. सिल्लोड) आणि म्हस्के (रा. सिद्धार्थनगर) अशी आरोपींची नावे असून. कडर्मिचे तिघा बाप-लेकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी शुक्रवारी (दि.२) दिली.

फिर्यादी सागर भागवत भारसकर (२८, रा. सुरेवाडी) यांच्या तक्रारीनुसार, त्याचा मावसभाऊ रोहित आढाव हा दुचाकीवरून घरी परतत असताना ठाकरे उद्यानासमोर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीसोबत त्याचा अपघात झाला. गाडीतील लोकांनी रोहितला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Sambhajinagar Crime News
Bribe Case : लाचखोर कार्यकारी अभियंता २४ तासांत निलंबित !

रोहितने फोन करून बोलावल्यानंतर सागर भारसकर हा गल्लीत राहणार मावसभाऊ विकास घुगे यास सोबत घेऊन बुलेटने तिथे पोहोचले. त्यावेळी तिथे असलेल्या आरोपींनी सागर यांना शिवीगाळ करत मारण्यासाठी अंगावर धावून आले. त्यांना सागरने ओळखले, आपला पैशाचा वाद आपापसांत बसून मिटवून घेऊ, अशी विनंती केली.

तेव्हा आर- ोपींनी आम्हाला पैसे नको, आज तुला संपवूनच टाकतो, असे म्हणून आरोपी सुनील कडमिंचे याने आपल्या कमरेचा चाकू काढून सागर यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. सागर यांनी वार चुकवल्यामुळे चाकू त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला खोलवर लागला, ज्यामुळे ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

सागर मृत झाल्याचे वाटल्याने आरोपी स्कॉर्पिओमधून पसार झाले. सागर याना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिडको पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तात्काळ कडमिंचे तिघा बाप-लेकांना गुरुवारी दुपारी अटक केली. आज शनिवारी (दि.३) तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news