Sambhajinagar News जालना रोडवर एकाखाली एक तीन जलवाहिन्या, कंत्राटदार कंपनीचा प्रताप

एमजेपीचे कामाकडे सपशेल दुर्लक्ष
Sambhajinagar News
Sambhajinagar News जालना रोडवर एकाखाली एक तीन जलवाहिन्या, कंत्राटदार कंपनीचा प्रताप File Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Jalna Road water channels

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरांतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. या कामातही मुख्य जलवाहिन्यांप्रमाणेच चुका होत असून, मुख्य रहदारीच्या जालना रोडवर एक फुटाच्या अंतराने एकाखाली एक तीन जलवाहिनी अंथरण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात यातील एक जलवाहिनी फुटली तर दुरुस्तीसाठी तिन्ही जलवाहिन्याचे पाणी बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर ओढावण्याची दाट शक्यता आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar Political : 'स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी आपल्या मंत्री पदाचा वापर'

शहरवासीयांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य शासन २७४० कोटी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. मात्र हजारो कोटी खर्चुनही जलवाहिनीचे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. जलवाहिन्या अंथरताना अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या चुका एमजेपी आणि कंत्राटदार जीव्हीपीआरकडून झाल्या आहेत. पैठण रस्त्यामध्ये टाकलेल्या जलवाहिनीचा प्रकार आता कुठे थंड झाला आहे.

आता शहरांतर्गत जलवाहिन्याचे कामही अशाच चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. दुध डेअरी ते मोंढा नाका दरम्यान मुख्य रहदारीच्या रस्त्यामधून ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. ही जलवाहिनी जुन्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अगदी एक फूट अंतर सोडून टाकण्यात येत आहे. त्यावर अर्घाफूट जागा सोडून आणखी एक ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली जात आहे. यात एकही जलवाहिनी भविष्यात फुटली, तर दुरुस्ती करताना महापालिकेची दमछाक होणार हे मात्र निश्चित आहे. असे असतानाही या कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar Political : मंत्री शिरसाटांविरोधात नाराजीचा सूर, शिवसेनेच्या बैठकीत लोकप्रतिनिधीनेच वाचला तक्रारींचा पाढा

काँक्रीट टाकताय

जलवाहिन्या एकाखाली एक टाकताना प्रत्येक जलवाहिनीवर सिमेंट काँक्रीट टाकण्यात येत आहे. त्यामुळे अडचण येणार नाही, असे एमजेपीकडून सांगण्यात येत आहे. तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या कामावर आक्षेप घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news