Luxury car registration 2026 : ई-कार पाठोपाठ रोल्स रॉईस, फॅन्टम्स कारचीही नोंदणी

वर्षभरात इम्पोर्टेड कारची संख्या २६ वर
Luxury car registration 2026
ई-कार पाठोपाठ रोल्स रॉईस, फॅन्टम्स कारचीही नोंदणीpudhari photo
Published on
Updated on

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर : शहरात इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच आता आलिशान आणि महागड्या आयात केलेल्या (इम्पोर्टेड) कारचीही नोंदणी वाढत आहे. ई-कारच्या वाढत्या संख्येनंतर आता रोल्स रॉईस, फॅन्टम्ससारख्या लक्झरी कारचीही नोंदणीची संख्या वाढत असल्याने शहरातील श्रीमंतीची झलक दिसून येत आहे. एप्रिल ते मार्च-२०२६ पर्यंत येथील आरटीओ कार्यालयात २६ इम्पोर्टेड कारची नोंदणी झाली असून, यातून शासनाला करोडो रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीनुसार, मागील वर्षभरात शहरात एकूण २६ इम्पोर्टेड कारची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये अत्यंत महागड्या आणि उच्च श्रेणीतील वाहनांचा समावेश असून, काही कारची किंमत ५ कोटी पेक्षाही जास्त असून, कमीत कमी एक कोटीपासून किमतीच्या गाड्यांचा समावेश आहे.

Luxury car registration 2026
Land rates increase: नवी मुंबईत भूखंडांच्या दरांचेही टेकऑफ

शहरातील उद्योगपती, व्यावसायिक आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांकडून अशा वाहनांना वाढती पसंती मिळत आहे. विशेषतः लक्झरी, आरामदायी सुविधा आणि ब्रँड व्हॅल्यूमुळे या कारकडे आकर्षण वाढले आहे.

ईव्हीकडेही ओढा

आतापर्यंत शहरात १ हजार ९०२ इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली आहे. यात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे पर्यावरणपूरक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचा दिसत आहे. मात्र, त्याचवेळी उच्चभू वर्गात लक्झरी आणि इम्पोर्टेड कारची मागणी कायम असल्याचेही स्पष्ट होत आहे. या वर्षभरात २६ कारमध्ये फरारी, लेक्सस, लैंड क्रुझर, रोल्स रॉईस, फॅन्टमसारख्या इम्पोर्टेड गाड्यांचा सहभाग आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयात केलेल्या वाहनांची नोंदणी करताना विशेष कर आणि नियम लागू होतात. तरीद-'खील नागरिक या प्रक्रियेचा स्वीकार करून अशा कारची खरेदी करत आहेत.

कोट्यवधींचा महसूल प्राप्त

एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेल्या वाहनांचा विशेष कर कमीत कमी २० लाखांपासून सुरुवात होते. यानुसार शहरात नोंदणी झालेल्या वाहनांच्या विशेष करातून आरटीओ कार्यालयाला कोट्यवधीचा महसूल प्राप्त झाला आहे. इम्पोर्टेड कार घेण्याकडे श्रीमंतांचा ओढा अलीकडच्या काळात वाढल्याची माहितीही आरटीओ कार्यालयाकडून मिळाली.

Luxury car registration 2026
Lonavala Municipal Council: लोणावळा नगर परिषदेचा 142 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; करवाढ नाही, 20 लाखांची शिल्लक
  • वर्षभरातील इम्पोर्टेड कारची नोदणी-२६

  • लक्झरी बँडच्या मागणी वाढ

  • ५ कोटींपेक्षाही जास्त किमतीच्या कारची नोंदणी

  • ई-कारसोबतच लक्झरी कारचा ट्रेंड कायम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news