Sambhajinagar Fraud Case : निवृत्त पीएसआयलाच लावला १ कोटी ३३ लाखांचा चुना

प्लॉटच्या व्यवहारात बनावट करारनामे; पैसे मागितल्यावर थेट बंदुकीचा धाक
Sambhajinagar Fraud Case
Sambhajinagar Fraud Case : निवृत्त पीएसआयलाच लावला १ कोटी ३३ लाखांचा चुनाfile photo
Published on
Updated on

Sambhajinagar Fraud Case: Retired PSI was cheated of Rs 1 crore 33 lakhs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

सर्वसामान्यांची फसवणूक होण्याच्या घटना नेहमीच घडतात, पण आता प्लॉट व्यवहाराच्या नावाखाली एका सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकालाच (पीएसआय) तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खरेदीखत करण्यास टाळाटाळ, बाऊन्स झालेले धनादेश आणि बनावट करारनाम्यांच्या आधारे ही मोठी फसवणूक झाली असून, पैसे मागितल्यावर चक्क बंदुकीचा धाक दाखवण्यापर्यंत या भूमाफियांची हिंमत वाढली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar Fraud Case
Chhatrapati Sambhajinagar fraud : जुनी कार विक्रीचा बहाणा : 6 लाखांची फसवणूक

शेख इरफान शेख शफिक, शेख सलमान शेख शफिक, गौसिया बेगम शेख शफिक, शेख शफिक ऊर्फ शेख साहब (सर्व रा. दिल्ली गेट), शेख जमील शेख गुलाम रसुल (३४, रा. रोजेबाग) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) अशी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. १५ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान दिल्ली गेट परिसरात हा फसवणुकीचा प्रकार घडला.

बंदुकीचा धाक आणि पोलिसांत धाव

त्यानंतर दिल्ली गेट येथील सलमान हॉलमधील दोन दुकाने विक्री करण्याचा करारही झाला. मात्र, जेव्हा चव्हाण आणि त्यांचे भागीदार दुकानाचा ताबा घेण्यासाठी गेले, तेव्हा शेख शफिक ऊर्फ शेख साहब याने त्यांना चक्क बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपींनी सातारा परिसरातील रो हाऊस विक्रीचा तात्पुरता करार करून तिथेही फसवणूक केली. आपली अतोनात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चव्हाण यांनी थेट आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतली. सखोल चौकशीनंतर आता सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Sambhajinagar Fraud Case
Sambhajinagar Crime : वैजापूरमध्ये जलसंधारण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

धनादेश वटले नाहीत; बनावट जीपीए मोठी रक्कम घेऊनही इरफानने जमिनीचे खरेदीखत करून दिले नाही. चव्हाण यांनी पैशांचा तगादा लावल्यावर त्याने जुलै २०२४ मध्ये ४० लाख रुपयांचे तीन धनादेश दिले. मात्र, हे धनादेश बाऊन्स झाले. त्यानंतर दिलेले इतर धनादेशही खाते बंद असल्याने वटले नाहीत. पैशांच्या बदल्यात इरफानने हिमायतनगर परिसरातील पाच प्लॉट देण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्ष खरेदीखत न करता केवळ नोंदणीकृत मुखत्यारनामा (जीपीए) करून दिला.

असा झाला दोन कोटींचा व्यवहार : एकतानगर परिसरातील सेवानिवृत्त पीएसआय गोरख मानसिंग चव्हाण (६०) यांची२०२३ मध्ये यासीन खान यांच्यामार्फत शेख इरफान याच्याशी ओळख झाली होती. इरफानने आपण जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगून चाऊस कॉलनीत १८.७ आर जमीन विक्रीस असल्याचे त्यांना सांगितले.

ही जमीन शेख जमील याच्या नावावर असल्याचे भासवण्यात आले. हा व्यवहार २ कोटी रुपयांत ठरला होता. त्यानुसार गोरख चव्हाण यांनी २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे दिले, तर त्यांचे मित्र यासीन खान यांच्यामार्फत विविध तारखांना रोख रक्कम, अशी एकूण १ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम इरफानला देण्यात आली. विशेष म्हणजे, ही रक्कम मिळाल्याची नोंद त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात रजिस्टरवर लिहून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news