Sambhajinagar Crime News : दोन फरार आरोपींना दीड वर्षाने अटक

छावणी पोलिसांना हद्दीत राहत असतानाही कळले नाही, गुन्हे शाखेने शोधले
 arrested
Sambhajinagar Crime News : दोन फरार आरोपींना दीड वर्षाने अटकFile Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Crime News: Two absconding accused arrested after one and a half years

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छावणी पोलिस ठाण्यात दाखल वेगवेगळ्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे, दोन्ही आरोपी छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच मजुरी आणि हॉटेलमध्ये काम करत असतानाही संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या हाती इतके दिवस कसे लागले नाहीत, असा प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित होत आहे.

 arrested
Sambhajinagar Political News : शिंदेंच्या घरवापसीने भाजपमध्ये नाराजी

ही कारवाई गुन्हे शाखेचे डीसीपी रत्नाकर नवले, एसीपी वसुंधरा बोरगावकर, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर, सिद्धार्थ थोरात, शैलेश ऑस्कर, यशवंत घोबाडे, अमोल मुगळे यांच्या पथकाने केली आहे.

 arrested
Crime News : वाळूज महानगरातून दोन महिलांसह तरुणी बेपत्ता

पोक्सोचा आरोपी परराज्यातून परतला, वेश बदलला

छावणी पोलिस ठाण्यात जून २०२४ मध्ये दाखल झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. या गुन्ह्यातील आरोपी मुरीद खान शमशेर खान (३७, रा. फुलेनगर, पडेगाव) हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. सुरुवातीला परराज्यात पळून गेला. काही दिवसांनी शहरात गुपचूप परत येऊन एका परधर्मीय मुलीशी लग्न केले आणि तो पडेगाव भागात मजुरी करून राहत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने आपली संपूर्ण ओळख लपवण्यासाठी वेशभूषा बदलली आणि दुसरे बनावट नावही धारण केले होते. या दरम्यान त्याने काही छोटे चोरीचे गुन्हे केल्याचाही पोलिसांना संशय आहे. तब्बल दीड वर्ष तो पोलिसांना सातत्याने चकमा देत होता, मात्र अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news