

A young woman along with two women goes missing from Waluj Mahanagar
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा वाळूज महानगर परिसरातून दोन महिला व एक १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली.
या विषयी पोलिसांनी सांगितले की, वैष्णवी ज्ञानेश्वर इंगळे (२० रा. वडगाव कोल्हाटी) या महिलेचा पती ११ नोव्हेंबर रोजी सकाळी कंपनीत कामाला गेला होता. दरम्यान महिलेने तिच्या लहान मुलास शेजारी राहणाऱ्या नातेवाईकडे सोडून त्यांना काही एक सांगता ती कुठेतरी निघून गेली.
दुसऱ्या एका घटनेत प्रियंका सुनील पांडव (२४ रा. माऊलीनगर, कमळापूर) ही महिला १३ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तिच्या आत्याला ब्युटी पार्लरला चालले असे सांगून ती घराबाहेर पडली. मात्र अद्यापपर्यंत ती घरी परत आली नाही. अन्य एका घटनेत पंढरपूर येथील पोलिस कॉलनीत राहणारी पायल आत्माराम गाडेकर ही १८ वर्षीय तरुणी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली. या तिन्ही घटनांप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस बेपत्ताची नोंद घेण्यात आली आहे.