Sambhajinagar News : दारूसाठी खुनीहल्ला करणाऱ्या गुन्हेगाराची सिडको पोलिसांनी काढली धिंड

मुळेला सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : दारूसाठी खुनीहल्ला करणाऱ्या गुन्हेगाराची सिडको पोलिसांनी काढली धिंड File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दारूसाठी पैसे न दिल्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करत मला हर्षल मुळे म्हणतात, अशी गुंडगिरी केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुळेला सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांच्या पथकाने बुधवारी (दि. २०) रात्री त्याची सिडको एन-९ भागातून धिंड काढून माज उतरवला.

Sambhajinagar News
Municipal Ward Structure : मनपा प्रभाग रचनेचा आराखडाच ठरला चुकीचा

अधिक माहितीनुसार, गुंड हर्षल मुळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. रविवारी (दि.१७) मध्यरात्री विनोद पोटदुखे त्याचे मित्र गजानन गाडेकर, आकाश राऊत, योगेश निकम, आकाश निकम हे राजू भाऊंच्या चहाच्या हॉटेलजवळ उभे होते. रात्री साडेअकराच्या सुमारास आकाश राऊतचे वडील तिथे आले. त्याचवेळी आरोपी हर्षल मुळे हा पण आला. त्याने आकाशच्या वडिलांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

त्याला पैसे देण्यास नकार देतच त्याने शिवीगाळ करून त्यांची पायातील चप्पल काढून घेतली. त्यामुळे आरोपीला आकाशसह विनोद, गजानन यांनी चप्पल परत दे असे म्हणत शिवीगाळ मारहाणीचा जाब विचारला. तेव्हा त्याने मला ओळखले नाही का? मला हर्षल गणेश मुळे म्हणतात असे म्हणून त्याने चाकू काढून थेट विनोदच्या डाव्या बरगडीवर आडवा वार केल्याने रक्तबंबाळ झाला. तसेच गाडेकरच्या कमरेजवळ पोटात जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने मारून दोघांना गंभीर जखमी केले होते.

Sambhajinagar News
Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्र वितरणातील अडचणी त्वरित सोडवा

हर्षल मुळे चाकूच्या धाकावर एन ९ भागात गुंडगिरी करायचा. त्याच्यावर हाणामारीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठवड्यात गुंड तेजाची धिंड काढल्यानंतर हर्षल मुळेलाही तीच ट्रीटमेंट दिल्याने शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news