Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्र वितरणातील अडचणी त्वरित सोडवा

न्या. शिंदे समितीने घेतला कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा
Kunbi Certificate
Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्र वितरणातील अडचणी त्वरित सोडवा File Photo
Published on
Updated on

Resolve issues with Kunbi certificate distribution immediately Shinde Committee

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विभागात मराठा कुणबी, कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणी त्वरित सोडवा, अशा सूचना कुणबी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने शासनाकडून नियुक्त शिंदे समितीने गुरुवारी (दि.२१) आढावा बैठकीत दिल्या. समितीने मनोज जरांगे पाटील यांनाही बैठकीला बोलाविले होते. मात्र जरांगे यांनी बैठकीकडे पाठ फिरविली.

Kunbi Certificate
Vehicle Tracking System : सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होणार व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समितीची बैठक झाली. बैठकीला आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

दोन दिवसांपासून शिंदे समितीचे तीन सदस्य मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. समितीच्या सदस्यांनी छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांतील तहसीलनिहाय अभिलेखांची माहिती घेतली. समितीने स्वतः तहसील व भूमी अभिलेख कार्यालयातील जुन्या अभिलेखांची पडताळणी केली. त्यानंतर आज समितीचे अध्यक्ष न्या. संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक पार पडली.

Kunbi Certificate
Municipal Ward Structure : मनपा प्रभाग रचनेचा आराखडाच ठरला चुकीचा

यात त्यांनी मराठवाड्यात आतापर्यंत तपासलेल्या नोंदी, वितरित करण्यात आलेली प्रमाणपत्रे यांचा आढावा घेतला. तसेच बीड येथून आलेल्या काही नागरिकांच्या म्हणणे ऐकूण घेतले.

आतापर्यंत २ लाख ३६ हजार प्रमाणपत्र वितरित

मराठवाड्यात मागील २२ महिन्यांत कुणबी जातीची २ लाख ३६ हजार प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. त्यासाठी महसूल व इतर यंत्रणांनी २ कोटी २१ लाख ५२ हजार ७१९ अभिलेख तपासली. विभागातील काही जिल्हाधिकाऱ्यांना समितीने सूचना केल्या आहेत. अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले आहे. आक्षेप असतील तर त्यांचा निपटारा करण्याची सूचना समितीने केली आहे, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news