Sambhajinagar Crime : मुख्य संपादकासह संपादकावर खंडणीचा गुन्हा दाखल

शाळेला मान्यता नाही, असे म्हणून वेळोवेळी त्रास देत संस्थाचालकास ३ लाखांची खंडणी मागणाऱ्या मुख्य संपादकासह संपादकावर गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime : मुख्य संपादकासह संपादकावर खंडणीचा गुन्हा दाखल File Photo
Published on
Updated on

Sambhajinagar Crime Extortion case filed against editor along with editor-in-chief

वाळूज, पुढारी वृत्तसेवा:

शाळेला मान्यता नाही, असे म्हणून वेळोवेळी त्रास देत संस्थाचालकास ३ लाखांची खंडणी मागणाऱ्या मुख्य संपादकासह संपादकावर वाळूज पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar Crime News
हैदराबाद गॅझेटवर ओबीसी समाजाची हरकत

याविषयी पोलिसांनी सांगितले की, चेतन बोरोले (रा. शिवाजीनगर, वाळूज) यांची कमळापूर रोडवर लिटल चॅम्पियन प्रि प्रायमरी इंग्रजी शाळा आहे. मान्यतेअभावी त्यांनी दुसरी शाळा सुरू केलेली नाही. मात्र मान्यताप्राप्त रवींद्रनाथ इंग्रजी शाळा सुरू असून, त्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

त्यामुळे सदरचे शाळेचे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग वाळूजच्या महावितरण कार्यालयासमोर भरविण्यात येतात. अशातच पायल जगदिश बुलबुले यांनी जि.प. प्राथमिक शिक्षण विभागात पत्र देऊन शाळेविषयी माहिती मागितली होती. सदर व्यवस्थापनाने त्यांना माहिती दिली होती. मात्र पायल बुलबुले आणि जगदिश बुलबुले यांनी शाळेला सतत त्रास देणे सुरूच ठेवले.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime : जेलमधून सुटताच कुख्यात मुकेश साळवेचा गुन्हेगारावर कोयत्याने हल्ला

त्यांनी सदर शाळेला मान्यता नसून, पालकांनी आपली मुले शाळेत पाठवू नये, अशा आशयाची बातमी दैनिकात छापून शाळेची बदनामी करणे सुरूच ठेवले. शाळेतील शिक्षक यशवंत महाजन हे सदर संपादकाच्या घराशेज ारीच राहातात. याविषयी माहिती घेण्यासाठी संस्थाचालकांनी महाजन यांना त्यांच्याकडे पाठविले असता त्यांनी आम्हाला ३ लाख रुपये द्या, आम्ही सर्व थांबवतो, असे संस्थाचालकांना सांगण्यास त्यांनी सांगितले होते. हे सर्व बोलणे शिक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले.

उभयतात झालेला संवाद महाजन यांनी संस्थाचालकांना ऐकविला. त्यात ते दोन ते अडीच लाख रुपयांची मागणी करीत असल्याचे आढळून आले. महाजन आणि संपादकामध्ये तडजोडीअंती अडीच लाख रुपयांची रक्कम देण्याचे ठरले. त्यात अर्धी रक्कम तात्काळ आणि उर्वरित नंतर देण्याचे ठरले. त्यानंतर संस्थाचालक चेतन बोरोले, शिक्षक यशवंत महाजन यांनी पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये मुख्य संपादक जगदिश बुलबुले व संपादक पायल बुलबुले यांची भेट घेतली. यावेळी संपादकांनी अडीच लाखांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख पंचवीस हजार आता, उर्वरित एक महिन्यानंतर देण्याचे ठरले.

संस्थाचालक बोरोले यांनी मंगळवारी वाळूज पोलिस ठाणे गाठून याविषयीची फिर्याद दिली. पोलिसांनी एका दैनिकाचे मुख्य संपादक जगदिश बुलबुले, संपादक पायल बुलबुले यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि. राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप वाघ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news