

Sambhajinagar children's home case Women's Commission takes serious note
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छावणीतील विद्यादीप बालगृहातून पलायन करणाऱ्या त्या ९ मुलींच्या प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुलींवर तिथे अतोनात अत्याचार झाले. अंगावर पवित्र पाणी शिंपडायचे, डोक्यावर क्रॉस काढायचे, मुलींचे साधे पोट दुखले तरी गरोदरपणाच्या चाचण्या केल्या जायच्या असे आरोप सामाजिक कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी केले आहेत.
विद्यादीपमध्ये नेमके काय घडले? मुलींच्या पलायनाचे कारण काय? यासह अन्य सर्व चौकशी करून सविस्तर अहवाल येत्या तीन दिवसांत पोलिस आयुक्तांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर याबाबत ठोस कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या छावणी भागातील विद्यादीप बालगृहात झालेल्या छळाबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हष ठाकूर म्हणाल्या की, मुलींना विद्यादीपमध्ये शारीरिक आणि मानसिकरीत्या त्रास दिला जात होता. त्यांना मारहाणदेखील केली जायची. कपडे बदलण्याच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले. दात घासण्यासाठीचे पेस्ट संपले असे मॅडमल सांगितले तर त्या तुम्हाला आम्ही इथे फुकट सांभाळत आहोत, या गोष्टी पाहिजे असतील तर कोणाकडे तरी जा असे म्हणून त्यांना वागणूक देण्यात आली.
बालगृहात येण्यापूर्वी या मुलींना आधीच कौटुंबिक व समाजातून अत्याचार सहन करावे लागले होते. त्यानंतर संरक्षणासाठी बालगृहात आणले असताना तिथेही त्यांना छळाच सामना करावा लागला. त्यामुळेच त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली, असे हर्ष ठाकूर म्हणाल्या. दरम्यान, राज्याच्या विधिमंडळातदेखील या घटनेचे पडसाद उमटले होते. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनीदेखील स्वतंत्र चौकशी समिर्त नेमली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेनुसार तीन वरिष्ठ महिल पोलिस अधिकारी देखील स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत. मुलींचे जबाब घेण्यात आले आहेत. इतर ८० मुलींचीदेखील चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे य प्रकरणात काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पीडित त्या मुलींनी पलायन करण्यापूर्वी ३० जूनला एक चिठ्ठी लिहिली आहे त्यामध्ये एका मुलीने विद्यादीपमध्ये राहायचे नसून मला नाशिक येथील बालगृहात स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली होती. ही चिड्डी बाल कल्याण समितीला लिहिण्यात आली होती. मात्र, समितीने याची तत्काळ दखल घेतलं नसल्याने मुलींनी टोकाचे पाऊल उचलले असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच पळून् जाण्यापूर्वी मुलींनी दुपारी बारापर्यंत समितीची वाट पहिली. कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे मुलींनी पुन्हा एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी सुविधा मिळत नाहीत तक्रारीची दखल घेतली जात नाही, सुविधा मिळाल्या नाहीत तर त्याला बाल कल्याण समितीच जबाबदार राहील असे त्या चिठ्ठीत लिहिले आहे.
विद्यादीप बालगृहात असे घडले असेल तर संस्थेचे प्रमुख तसेच ट्रस्टी यांच्याक कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अशी गोष्ट घडणे चिंताजनक आहे राज्यात अनेक मुलींच्या वसतिगृहात असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. रस्त्यावरील् माताभगिनी सुखरूप नाहीत. गरिबांच्या मुलींसाठी सुरू केलेल्या हॉस्टेलमध्ये गैरप्रका झाला असेल तर सरकारने यासंदर्भात स्वतंत्र कायदा आणला पाहिजे, अशी मागण आ. रोहित पवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.