

Robbery at seven places in Pokhari in one night
गारज, पुढारी वृत्तसेवा: वैजापूर तालुक्यातील पोखरी येथे एकाच रात्री सात ठिकाणी चोरट्यांनी घराच्या कुलूप कोयंडे तोडून रोख रकमेसह २० तोळे सोने चोरल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी ६ वाजता उठल्यावर ग्रामस्थांना लक्षात आल्याने एकच आरडाओरड सुरू झाली.
शुक्रवारी रात्री अट्टल चोरट्यांनी पोखरी गावात घुसून कालीकामाता मंदिराची दानपेटी फोडून ७ ग्रॅम सोने व १५ ते २० हजार रुपये रोख रकमेवर डल्ला मारत गावातील बाळू काशिनाथ महाले यांचे १ तोळा सोने, साहेबराव महाले यांचे ५० हजार रुपये रोख रक्कम, विजय मोगल यांनी नुकतीच मका विकून घरात ठेवलेले ४० हजार रुपये रोख रक्कम, लक्ष्मण ठुबे यांचे १८ तोळे सोने, राजकुमार ठुबे व योगेश मोरे यांच्या घरात काही सापडले नाही.
असे एकूण ७ ठिकाणी एकाच रात्री जबरी चोरी झाली. असून यात २० तोळे सोन्यासह १ लाख रुपये रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली. यात एकूण १ लाख रुपये रोख आणि २६ लाख रुपये किमतीचे सोने असे एकूण २७ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कालिका माता मंदिरातील दानपेटी फोडून १५ ते २० हजार रुपये व ४ सोन्याच्या नथी तर लक्ष्मण ठुबे यांचे २ तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट, ५ मंगळसूत्रे पोथी चोरी झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. बाळू महाले यांनी पोलिस पाटील व सरपंच यांना चोरीच्या घटनेची माहिती कळवली. पोलिस पाटील यांनी शिऊर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनी वैभव रणखांब, विट जमादार गणेश गोरक्ष यांनी आपल्या फौजफाट्यासह सकाळी ७ वाजता घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले. उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी भेट देऊन श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ व गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करण्यात आले.
पाण्याचा वापर करत बोटाचे ठसे मिटविले
चोरट्यांनी ७ ठिकाणी चोरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी पाण्याचा वापर केल्याचे दिसून आले कपाटावर, दानपेटीवर, दरवाजावर अशा विविध ठिकाणी घरफोडी झालेल्या ठिकाणी पाणी फेकून बोटाचे ठसे मिटविण्याचा प्रयत्न या अट्टल चोरट्यांनी केल्याचे माजी सरपंच शिवाजी जाधव यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास शहर पोलिस स्टेशनचे एपीआय वैभव रणखांब व बिटजमादार गणेश गोरक्ष हे करत