Sambhajinagar News : मनपा-कंत्राटदाराच्या वादात १६०५ कर्मचारी वेठीस

तीन महिन्यांचे वेतन ररवडले, दसऱ्यासह दिवाळीही जाणार आंधारात
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : मनपा-कंत्राटदाराच्या वादात १६०५ कर्मचारी वेठीसFile Photo
Published on
Updated on

Sambhajinagar 1,605 employees stranded in municipal-contractor dispute

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासन आणि कंत्राटी तत्वावर कामगार पुरवठा करणाऱ्या महाराणा एजन्सीमधील वाद शिगेला पोहोचला आहे. कंत्राटदार दरमहा पगार करीत नाही.

Chhatrapati Sambhajinagar
Shri Balaji Rath : आज सीमोल्लंघन, कर्णपुरा येथे जय्यत तयारी

पीएफ, ईएसआयसीचे पैसे भरणा करीत नाही, असा ठपका ठेवत प्रशासक जी. श्रीकांत यांनी महाराणाचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु या दोन्ही यंत्रणेच्या वादात मागील तीन महिन्यांपासून १६०५ कंत्राटी कामगार पगारीविना नाहक भरडले जात असून, दसऱ्यापाठोपाठ आता दिवाळीही आंधारात जाते की काय, अशी भीती त्यांच्यापुढे निर्माण झाली आहे.

महापालिकेला मागील २० वर्षांपासून कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम महाराणा एजन्-सीद्वारे केले जात आहे. २०१६ साली या एजन्सीला नव्याने तब्बल २ हजार कामगार पुरविण्याचे काम देण्यात आले होते. या एजन्सीने प्रशासनाच्या मागणीनुसार कंत्राटी तत्वावर कामगार पुरविले. परंतु मागील काही दोन वर्षांपासून कंत्राटदार आणि महापालिका प्रशासन यांच्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून वाद रंगला आहे. त्यात पुण्याच्या एका कामगार संघटनेने प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे तक्रार करून किमान वेतनाप्रमाणे कंत्राटदार एजन्सी कामगारांना वेतन देत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने एजन्सीला किमान वेतनाचे आदेश देण्यात आले होते.

Chhatrapati Sambhajinagar
Marigold Flower : अतिवृष्टीने झेंडू नासवला, दसऱ्यानिमित्त आवक घटली

दरम्यान, करारात जेवढे वेतन ठरले, तेवढेच आपण कंत्राटी कर्मचाऱ्यांना देतो, असा दावा महार-ाणा एजन्सीने केला होता. याशिवाय कंत्राटदार एजन्सी कामगारांचा पीएफ आणि ईएसआयसी भरणा करीत नाही, अशीही तक्रार पुढे आली होती. या दोन्ही तक्रारींवरून मागील दीड वर्षापासून महापालिका प्रशासन आणि महाराणा एजन्सीमध्ये वाद सुरू होता.

अखेर या वादाचा समारोप कंत्राट रद्द करण्यावरून झाला

मात्र ही कारवाई करण्यापूर्वी महापालिकेकडे कंत्राटी १६०५ कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. मनपाकडूनच वेतन मिळत नसेल तर आम्ही कामगारांना काय द्यायचे, असा सवाल एजन्सीकडून उपस्थित केला जात आहे.

थकीत पगार दोन दिवसांत द्या

ऑक्टोबरमध्ये दिवाळी सण आहे. त्यामुळे आपल्याकडे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २१ जून ते २० जुलै २०२५, २१ जुलै ते २० ऑगस्ट २०२५ या दोन महिन्यांचा थकीत पगार दोन दिवसांच्या आत करावा. हा पगार अदा केल्याची खातरजमा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिका आपणास पगाराची रक्कम अदा करेल, असे पत्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी महाराणा एजन्सीला दिले आहे. तसेच दिरंगाई केल्यास नियमानुसार कार्यवाहीचा इशाराही दिला आहे.

दसरा तोंडावर हात रिकामे

महापालिकेने मागील तीन महिन्यांपासून महाराणा एजन्सीला कंत्राटी १६०५ कर्मचाऱ्यांचे वेतनाचे पैसे अदा केलेले नाही. त्यामुळे आज दसरा सणोत्सव असूनही या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या १५ दिवसांनी दिवाळी सण असून, हा सणही आंधारात जातो की काय, अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news