Chhatrapati Sambhaji Nagar Fire | कुंजखेड्यात गोठ्याला भीषण आग; शंकरपटातील तीन बैल गंभीररीत्या भाजले

शेड, दुचाकी व शेती साहित्य जळून खाक; सुमारे ५० लाखांच्या नुकसानीचा अंदाज
Kannad Kunjkheda Fire Incident
Kannad Kunjkheda Fire Incident Pudhari
Published on: 
Updated on: 

Kannad Kunjkheda Fire Incident

कन्नड : तालुक्यातील कुंजखेडा येथे मंगळवारी (दि. १३) सकाळी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत अशफाक कलंदर साहेबवाडा यांच्या मालकीचा गोठा जळून खाक झाला. या आगीत शंकरपटात धावणारे तीन नामांकित बैल गंभीररीत्या भाजले. तर मोटारसायकल, शेती उपयोगी साहित्य आणि गोठ्याचे शेड जळून मोठे नुकसान झाले. या घटनेत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कुंजखेडा येथील अशफाक साहेबवाडा यांच्या गोठ्याला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोठ्यात बांधलेले शंकरपटावर धावणारे तीन नामांकित बैल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या आगीत तिन्ही बैल मोठ्या प्रमाणात भाजून गंभीर जखमी झाले. हे बैल परिसरात प्रसिद्ध असून, त्यांची अंदाजे किंमत मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Kannad Kunjkheda Fire Incident
Chhatrapati Sambhaji Nagar Weather News : किमान तापमानात लक्षणीय घट, पारा 10.6 अंशांवर

आगीची तीव्रता वाढल्याने गोठ्याचे शेड, मोटारसायकल, शेती उपयोगी साहित्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा वेग अधिक असल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे साहेबवाडा कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Kannad Kunjkheda Fire Incident
Chhatrapati Sambhaji nagar : एकाच कुटुंबातील तीन महिलांचा विज पडून मृत्यू, कन्नड तालुक्यातील घटना!

या घटनेची माहिती मिळताच बीट जमादार किरण गंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, प्रशासनाने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानीचे तातडीने मूल्यांकन करावे आणि बाधित शेतकरी कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख कल्याण आबा चव्हाण यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news