

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसराच्या किमान तापमानात अचानक मोठी घसरण झाली असून, हुडहुडी भरवणारी थंडी वाढली आहे. चिकलठाणा वेधशाळेने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी (दि.१८) शहराचा किमान पारा तब्बल अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेली चढ-उताराची मालिका सुरू असून, थंडीचा कडका वाढला आहे.
शहर व परिसरात दिवसा काहीअंशी ऊन तर रात्री थंडीचा तडाखा वाढला आहे. अचानक गारवा वाढल्याने बोचरी थंडी प्रकर्षाने जाणवू लागली आहे. दरम्यान, आकाश स्वच्छ आणि वातावरण कोरडे असल्याने सूर्यास्तानंतर तापमान वेगाने कमी होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत किमान तापमान दोन ते तीन अंशांची घट नोंदवली गेली आहे. हवेत ओलावा कमी व वाऱ्याचा वेग मंद असल्याने रात्रीचा गारवा १०.६ अधिक वाढला आहे. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही किमान तापमानात घसरण सुरू आहे.
काही भागांत पहाटे १० अंशांच्या आसपास तापमान नोंदले जात असून, धुक्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते दिवस तापमानात आणखी घसरण होऊ शकते. हवामानात कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १० 10 ते १२ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर मंगळवारी (दि.18) शहरात किमान तापमान २७.७, तर किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, यंदाचे हे सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून मानले जात आहे. यावरून आता रात्री वाढणारा गारवा आणि पहाटेच्या थंड हवेत वाढ होणार असून नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.