

वाळूज महानगर : साजापूर शिवारातील एका मोकळ्या भूखंडावरील कचरा पेटवल्याने लागलेल्या भीषण आगीत पॅकेजिंग कंपनीसह भंगाराचे गोडाऊन जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी (दि. १६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
वाऱ्यामुळे आग पसरून एस. के. पॅकेजिंग आणि खालीद ट्रेडर्सला विळखा घातला. यात लॅमिनेशन मशीन, कार्टून बॉक्स आणि प्लास्टिक साहित्यासह लाखोंचा माल जळून खाक झाला. परिसरात धुराचे लोट पसरल्याने घबराट निर्माण झाली होती.
वाळूज एमआयडीसी, मनपा अग्निशमन दल आणि खाजगी टँकरच्या मदतीने तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. नागरी वसाहतीतील अशा अनधिकृत भंगार गोडाऊनची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.