Lasur theft : कारमधून १४ लाखांची चोरी

हॉटेलमध्ये जेवायला थांबणे भोवले दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार
Rs 14 lakh cash theft
MoneyPudhari
Published on
Updated on

लासूर स्टेशन : जेवायला थांबलेल्या लासूर स्टेशन येथील कापूस व्यापाऱ्याच्या कारगाडीच्या डिक्कीतून १४ लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान नागपूर मुंबई महामार्गावर आसेगाव चौकात घडली.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंजरपूर येथील रहिवास हबीब शहाबुद्दीन पठाण लासूर स्टेशन येथे कापसाचा व्यापार करतात ते शुक्रवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथून त्यांच्या कारमधून १४ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन लासूर स्टेशनकडे येत होते दरम्यान ते आसेगाव चौकात जेवणासाठी एका हॉटेलवर थांबले. त्यांची कार बंद केल्यानंतर सुरू होत नव्हती. त्यामुळे ते गाडी सुरूच ठेवून गाडीच्या बाजूलाच जेवायला बसले.

Rs 14 lakh cash theft
Nylon manja sale raid : कन्नडमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा

जेवण आटोपल्यावर त्यांना गाडीत बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गाडीच्या डिक्कीतून पैसे चोरी झाले. काही वेळ चोरी गेलेल्या रकमेचा तपास केल्यानंतर त्यांनी दौलताबाद पोलिस स्टेशनकडे धाव घेऊन घटना कळवली. रात्री उशिरा दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Rs 14 lakh cash theft
Dust pollution on crops : लासूर देवगाव रोडवरील धूळकांडाने शेतकरी हैराण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news