

कन्नड : शहरातील पाढरी मोहल्ला येथील एका किराणा दुकानात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कन्नड शहर पोलिसांनी शनिवारी (दि.१३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून २,७२० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला.
या प्रकरणी मुजक्कीर युनुस खान (वय ४३, रा. पाढरी मोहल्ला, कन्नड) याच्याविरुद्ध कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. त्या नंतर जमिनीवर सुटका देखील करण्यात आल्याचे सहाय्यक फौजदार नासेर पठाण यांनी सांगितले.
मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याचा छंद अनेकजण जोपासतात. मात्र दोराऐवजी नायलॉन मांजा वापरल्यामुळे पक्षी, लहान मुले व वाहनचालक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. नायलॉन व सिंथेटिक मांजा पर्यावरणास तसेच पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याने त्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाविरोधात पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांची करडी नजर आहे.
पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंढके, सहाय्यक फौजदार नासेर पठाण व लोढे हे पेट्रोलिंग खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार पाढरी मोहल्ला येथील मुजाहिदीन किराणा दुकानात छापा टाकून मुजक्कीर युनुस खान याला नायलॉन मांजा विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. दुकानाची झाडाझडती घेतली असता २,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार नासेर पठाण करत आहेत. दरम्यान पोलिसांनी सलत तीन दिवसांपासून मांज विक्रेत्यावर कारवाई सुरु केल्याने कारवाईच्या करत असताना धास्तीने मांजा विक्रेत्यांध्ये धास्ती पसरली आहे. मांत विक्रेत्यावर पोलिसांनी करडी नजर आहे.